---Advertisement---

ENG vs IND । ‘हा विजय सर्वात भारी…’, हैदराबाद कसोटी इंग्लिश कर्णधारासाठी ठरली खास, वाचा अजून काय म्हणाला

Ben Stokes With Test squad
---Advertisement---

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ 28 धावांनी पराभूत झाला. रविवारी (28 जानेवारी) सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने बाजी मारली. शेवटच्या डावात भारतीय फलंदाजी कमजोर दिसून आली, तर इंग्लंडसाठी टॉम हार्टली याने अप्रतिम प्रदर्शन केले. फिरकीपटू गोलंदाजाने पदार्पणाच्या या सामन्यात एकूण 9 विकेट्स घेतल्या. यातील सात विकेट्स त्याने रविवारी घेतल्या. कर्णधार बेन स्टोक्स यानेही या प्रदर्शनासाठी हार्टलीचे कौतुक केले.

इंग्लंड संघाचा दुसरा डावत रविवारी दुसऱ्या सत्रात संपला. 102.1 षटकात इंग्लंडने 420 धावा करून सर्व विकेट्स गामावल्या. प्रत्युत्तारत भारताला विजयासाठी 231 धावांचे लक्ष्य मिळाले. सुरुवातील सोपे वाटणारे हे लक्ष्य भारताला सुरुवातीच्या विकेट्स गमावल्यानंतर कठीण वाटू लागले. रविचंद्रन अश्विन आणि केएस भरत यांनी अर्धशतकी भागीदारी केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आल्यासारखे वाटले. मात्र, ही जोडी भारताला विजय मिळवून देऊ शकली नाही. टॉम हार्टली याचा हा कसोटी पदार्पणाचा सामना होता. पहिल्या डावात त्याने 2 विकेट्स घेतल्या होत्या. तर रविवारी दुसऱ्या डावात फिरकीपटूने 7 विकेट्स नावावर केल्या. सात विकेट्स घेण्यासाठी त्याने 26.2 षटके गोलंदाजी केली आणि 62 धावाही खर्च केल्या. तत्पूर्वी पहिल्या डावात देखील त्याला 25 षटके गोलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. कर्णधार बेन स्टोक्स याने जाणीवपूर्व फिरकीपटूकडून जास्त गोलंदाजी करून घेतली.

सामना जिंकल्यानंतर स्टोक्सने हार्टलीला इतकी षटके गोलंदाजी देण्याचे कारण सांगितले. इंग्लिश कर्णधाराच्या मते हार्टली पहिल्यांदा कसोटी संघाचा भाग बनला असून त्याच्यात अस्मविश्वास वाढावा, यासाठी त्याला गोलंदाजीची जास्त संधी दिली. स्टोक्स म्हणाला, “संघासोबत टॉम हार्टलीची ही पहिलीच वेळ होती. त्याचा आत्मविश्वास वाढावा, यासाठी मी त्याला मोठा स्पेल देण्याच्या तयारीत आधीपासून होतो.” ओली पोपने या सामन्यात केलेल्या 196 धावांच्या खेलीबाबत देखील स्टोक्स बोलला. कर्णधार म्हणाला, “उपखंडात इंग्लिश फलंदाजाची (पोप) ही सर्वोत्तम खेळी आहे.”

स्टोक्स एप्रिल 2022 मध्ये इंग्लंडचा पूर्णवेळ कसोटी कर्णधार बनला. त्याच्या नेतृत्वात इंग्लंडने बॅझबॉल नीती वापरून अनेक मालिका जिंकल्या. पण यामध्ये रविवारी (28 जानेवारी) भारताविरुद्ध मिळवलेला विजय सर्वोत्तम होता, असे स्वतः स्टोक्स म्हणाला, “मी कर्णधार बनल्यापासून आम्ही अनेक विलक्षण क्षण अनुभवले. पण कदाचित हा विजय 100% आणचा सर्वात मोठा विजय असू शकतो.”

दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारताचा युवा फलंदाज शुबमन गिल पहिल्या डावात 23, तर दुसऱ्या डावात शुन्यावर बाद झाला. संघातील इतरही फलंदाजांनी अपेक्षित प्रदर्शन केले नाही. फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी दोन्ही डावांमध्ये महत्वपूर्ण विकेट्स घेतल्या.

महत्वाच्या बातम्या – 
कसोटी क्रिकेटचे सैंदर्य! वेस्ट इंडीजच्या विजायने लारांच्या डोळ्यात पाणी, गिलक्रिस्टने मारली मिठी । VIDEO
AUS vs WI । कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील मोठा उलटफेर! कॅरेबियन गोलंदाजांकडून यजमान ऑस्ट्रेलियाला धक्का

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---