चेन्नईच्या चेपॉक स्टेडियम म्हणजेच एमए चिदंबरम स्टेडियममधील खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरत असते. परंतु भारत विरुद्ध इंग्लंड यांच्या पहिल्या कसोटी सामन्यात चित्र काही वेगळेच पाहायला मिळाले. फिरकी गोलंदाजांबरोबरच इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनाही या मैदानावर मदत मिळाली.. यामुळेच भारतीय संघाला पहिला कसोटी सामना गमवावा लागला होता. तसेच सामन्याच्या पाचव्या दिवशी फलंदाजांना फलंदाजी करणे कठीण जात होते.
या सामन्यानंतर चेन्नईतील खेळपट्टी भरपूर वादात आली होती. अशातच दुसरा सामन्यात काळया मातीचा उपयोग करून खेळपट्टी बनवली जाऊ शकते. येत्या १३ फेब्रुवारीपासून दुसरा कसोटी सामना याच मैदानावर खेळवण्यात येणार आहे. चेपॉक मैदानावर एकूण पाच खेळपट्ट्या आहेत. पहिला कसोटी सामना हा दुसऱ्या क्रमांकाच्या खेळपट्टीवर खेळवण्यात आला होता. परंतु १३ फेब्रुवारी पासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी पाचव्या क्रमांकाच्या खेळपट्टीचा वापर करण्यात येऊ शकतो.
चेन्नईतील लाल माती मुंबईपेक्षा वेगळी
मुंबईतील मैदानांच्या खेळपट्टीवर लाल मातीचा उपयोग केला जातो. यामुळेच संपूर्ण सामन्यात खेळपट्टी तशीच राहते. परंतु चेन्नईत खेळपट्टी बनवण्यासाठी ज्या लाल मातीचा वापर केला जातो. ती माती मुंबईतील लाल माती पेक्षा वेगळी आहे. याच कारणास्तव चेन्नईतील खेळपट्टी लवकर खराब होते. पहिल्या सामन्याआधी स्पष्ट करण्यात आले होते की, खेळपट्टी अशाप्रकारे बनवण्यात आली आहे की, ज्याचा फायदा दोन्ही संघांना होईल.
परंतु, खेळपट्टीने काही वेगळेच रंग दाखवले. नवीन चेंडूने आपली चमक लवकर गमावली. यामुळेच ईशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना गडी बाद करण्यात अपयश आले.
फिरकी गोलंदाजांना मिळू शकेल मदत
दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळू शकेल. हा सामना पाचव्या क्रमांकाच्या खेळपट्टीवर खेळवला जाऊ शकतो. क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, खेळपट्टीवर लाल मातीचा थर आहे. परंतु त्यावर काळया मातीचा थर आहे. याच कारणास्तव फिरकी गोलंदाजांना मदत मिळू शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
पोरांची आयपीएल! तीन दिग्गज माजी क्रिकेटपटूंची पोरं उतरणार आयपीएल लिलावात, पाहा कोण आहेत ते चेहरे
IND Vs ENG : एक शतक अन् पाँटिंगला पछाडत कोहलीच्या नावावर होणार ‘वर्ल्डरिकॉर्ड’