शनिवारी (3 फेब्रुवारी) यशस्वी जयस्वाल याला नेहमीच लक्षात राहणारा ठरला. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात जयस्वालने शनिवारी आपले द्विशतक पूर्ण केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे त्याचे पहिलेच द्विशतक ठरले. पहिल्या दिवसाखेर जयस्वाल 179* धावांसह नाबाद होता. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पहिल्याच सत्रात सलामीवीर फलंदाजाने द्विशत पूर्ण केले.
इंग्लंडविरुद्धच्या हा दुसरा कसोटी सामना असून भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. संघातील एकही फलंदाज 35 धावांपेक्षा मोठी खेळी करू शकला नव्हता. पण अशा अवघड खेळपट्टीवर यशस्वी जयस्वाल () याने द्विशतक झळकावले. 277 चेंडूत 18 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने त्याने द्विशतक पूर्ण केले.
दरम्यान, पहिल्या दिवसाखेर भारताची धावसंक्या 6 बाद 336 धावा होती. दुसऱ्या दिवशी जयस्वालने शतक जेम्स अँडरसन याने जयस्वालला वैयक्तिक 209 धावांवर बाद केले. ही भारतीय संघाची आठवी विकेट होती आणि त्यावेळी संघाची धआवसंख्या 8 बाद 383 धावा होती.
Yashasvi Jaiswal becomes the 4th Indian to score Double Hundred in WTC after Kohli, Agarwal & Rohit. ⭐ pic.twitter.com/e319jlUuke
— Johns. (@CricCrazyJohns) February 3, 2024
(DOUBLE CENTURY FOR JAISWAL!)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार, कुलदीप यादव
इंग्लंड – झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रुट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, शोएब बशीर, जेम्स अँडरसन.
महत्वाच्या बातम्या –
प्रथम श्रेणी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा । विजय क्लब, जय भारत क्रीडा, अंकुर स्पोर्टस् उपांत्यपूर्व फेरीत दाखल
विसरू नका बाहेर ‘तो’ वाट पाहत आहे! फ्लॉप ठरलेल्या गिल-अय्यरला दिग्गजाचा थेट इशारा