---Advertisement---

IND vs ENG । शत्रूसाठी लावलेल्या जाळ्यात भारतीय संघच अडकणार? दुसऱ्या कसोटीबाबत हरभजनच मोठं भाष्य

On: बुधवार, जानेवारी 31, 2024 3:08 PM
Harbhajan Singh
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणममध्ये सुरू होणार आहे. उभय संघांतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने धावांनी भारताला पराभूत केले होते. पहिल्या सामन्यात भारतीय संघ विजयासाठी दावेदार मानला जात होता. पण इंग्लंडने सामन्यातील तिसऱ्या डावात चित्र पूर्णपमे बदलले. शेवटच्या डावात भारतीय संघ 231 धावांचे लक्ष्य गाठू शकला नाही. आता दुसऱ्या सामन्याआधी भारतीय संघाला माजी दिग्गज हरभजन सिंग याच्याकडून महत्वाचा सल्ला मिळाला आहे.

भारतीय संघ सध्या युवा खेळाडूंनी भरलेला आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना भारताने गमावला. पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये विराट कोहली () याने आधीच माघार घेतली आहे. दुसऱ्या कसोटीआधी रविंद्र जडेजा आणि केएल राहुल दुखापतग्रस्त झाले आहेत. या दोघांना आता विशाखापट्टणममध्ये संघासाठी खेळता येणार नाहीये. अशात भारतीय फलंदाजी क्रमात अनुभवाची कमी दिसत आहे. हरभनजच्या मते खेळपट्टी फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल बनवली गेली, तर ही चाल भारतालाच महागात पडू शकते. कारण युवा खेळाडूंच्या प्रदर्शनाबाबत खात्री देता येणार नाही. माजी फिरकीपटूच्या मते रोहित शर्मानंतर संघात केवळ रविचंद्रन अश्विन धावा करेल, असे वाटते. कारण संघातील प्रमुख खेळाडू आगामी सामन्यात खेळणार नाहीत.

“संघ चांगला दिसत आहे, पण अनुभव कमी आहे. होय, रोहित शर्मा आहे, पण त्यानंतर सर्वश्रेष्ठ रन-स्कोरर अश्विनच आहे. फलंदाजीच्या बाबत लाईन-अप कमजोर दिसत आहे. फिरकीसाठी अनुकूल खेळपट्टीवर जर हा सामना खेळला गेला, तर मला वाटते की सावधगिरी बाळगली पाहिजे. कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल यांच्यासह वॉशिंगटन सुंदरला संघात घेतले आहे. त्यामुळे मला वाटते खेळपट्टी फिरकीसाठी अनुकूल असेल.”

मायदेशात फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीवर भारतीय संघ नेहमीच विरोधकांसाठी घातक ठरला आहे. पण हरभजनच्या मते यावेळी परिस्थिती भारताच्या विरोधात जाऊ शकते. कारण संघातील फलंदाजांना जास्त अनुभव नाहीये. हरभजन पुढे म्हणाला, “भारताने सावध भूमिका घेतली पाहिजे. पाहुण्यांसाटी फिरकी गोलंदाजीला अनुकूल असणारी खेळपट्टी बनवली जाईल. पण या जाळ्यात स्वतः संघ अडकू शकतो. संघातील फलंदाजी क्रम युवा आहे. त्यांना सेट होण्यासाठी वेळेची गरज आहे. जर त्याला चांगली खेळपट्टी मिळाली, तर प्रदर्शन देखील चांगले करू शकतात.”
(Harbhajan Singh made a big comment about the second test)

महत्वाच्या बातम्या – 
मोठी बातमी! ACCच्या अध्यक्षपदी शहांची फेरनिवड, ICC अध्यक्षपदाबाबत संभ्रम
रोहित की विराट? माजी इंग्लिश दिग्गजाचा किंगला पाठिंबा; म्हणाला, ‘पहिल्या कसोटीत…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---