---Advertisement---

यशस्वी जयस्वाल सोडता भारताचे सर्व फलंदाज फ्लॉप, अँडरसन पुन्हा फॉर्मात, शनिवारी पहिल्या सत्रात भारत सर्वबाद

On: शनिवार, फेब्रुवारी 3, 2024 11:11 AM
Yashasvi Jaiswal James Anderson
---Advertisement---

विशाखापट्टणम कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचा पहिला डाव संपला. यशस्वी जयस्वाल याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले द्विशतक ठोकले. पहिल्या दिवसाखेर भारताची धावसंख्या 6 बाद 336 धावा होती. पण शनिवारी संघ 396 धावांवर सर्वबाद झाला. एकटा जयस्वाल सोडला, तर भारतासाठी एकही फलंदाज 35 धावांची खेळी करू शकला नाही.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघ मैदानात आल्यानतंर रविचंद्रन अश्विन याच्या रुपात संघाला पहिला झटका बसला. अश्विनने 101व्या षटकात वैयक्तिक 20 धावा करून जेम्स अँडरसन याला विकेट सोपवली. त्यानंतर डावातील 107व्या षटकात अँडरसन यानेच जयस्वालला 209 धावावर जॉनी बेअरस्टोच्या हातात झेलबाद केले. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (6) याच्या रुपात भारताने 9वी, तर मुकेश कुमार (0) याच्या रुपात 10वी विकेट गमावली.

पहिल्या दिवशी अवघी एक विकेट घेणारा अँडरसन दुसऱ्या दिवशी सुरुवातीच्या षटकांमध्ये चांगल्या फॉर्मात दिसला. त्याने अश्विन आणि जयस्वाल या दोन महत्वाचा विकेट्स घेतल्या आणि भारताचा डाव थोडक्यात आटोपला. अँडरसनने टाकलेल्या 25 षटकांमध्ये 47 धावा खर्च केल्या आणि तीन विकेट्स नावावर केल्या. फिरकीपटू शोएब बशीर आणि रेहान अहमद यांनीही खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उचलला. दोन्ही फिरकीपटू गोलंदाजांनी वैयक्तिक तीन-तीन विकेट्स घेतल्या.

भारतीय संघासाठी सामन्याच्या या पहिल्या डावात यशस्वी जयस्वालने 277 चेंडूत द्विशतक पूर्ण केले. जयस्वालने पहिल्या डावात एकूण 19 चौकार आणि 7 षटकार मारले. पण एकटा जयस्वाल सोडला, तर संघातील एकही फलंदाज मोठी खेळी करू शखला नाही. शुबमन गिल याने 34, तर रजत पाटीदार याने 32 धावांचे योगदान दिले. श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 27-27 धावांची खेळी केली. अश्विनने 20, तर केएस भरत 17 धावा करून बाद झाले. सलामीला आलेल्या रोहित शर्मा याने चांगलीच निराशा केली. कर्णधाराने 41 चेंडू खेळून 14 धावा केल्या आणि विकेट गमावला.

उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार, कुलदीप यादव

इंग्लंड – झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रुट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, शोएब बशीर, जेम्स अँडरसन.
(INDIA BOWLED OUT FOR 396)

महत्वाच्या बातम्या – 
18व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी कप क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत दसॉल्ट सिस्टिम्स, ॲमडॉक्स संघांचा दुसरा विजय
प्रथम श्रेणी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा । विजय क्लब, जय भारत क्रीडा, अंकुर स्पोर्टस् उपांत्यपूर्व फेरीत दाखल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---