शनिवारी (3 जानेवारी) यशस्वी जयस्वाल याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले. भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू असून उभय संघ विशाखापट्टणममध्ये दुसरा कसोटी सामना खेळत आहेत. या सामन्याच्या पहिल्या डावात भारताचे इतर फलंदाज अपयशी ठरले. पण यशस्वी जयस्वालने संघाला मोठी धावसंख्या उभी करून दिली. विकेट गमावल्यानंतर जयस्वालला स्टेडियममध्ये मिळालेला मान, पाहण्यासारखा होता.
क्रिकेट खेळणारा सर्वात जुना देश, अशी इंग्लंडची ओळख आहे. इंग्लंड संघासोबतच त्यांच्या चाहत्यांमध्येही अनेकदा या गोष्टीचा गर्व पाहायला मिळतो. इंग्लिश चाहते अनेकदा ऍशेस मालिकेत ऑस्ट्रेलियन खेळाडूंसोबत गैरवर्तन करतानाही दिसले आहेत. पण शनिवारी (3 जानेवारी) हेच इंग्लिश चाहते यशस्वी जयस्वालसाठी स्टॅन्डमध्ये उभे राहिले. भारतीय सलामीवीर फलंदाजाने या सामन्यात 209 धावांची खेळी केल्यानंतर जेम्स अँडरसनने त्याला जॉनी बेअरस्टोच्या हातात झेलबाद केले. विकेट गमावून पवेलियनमध्ये जात असताना जयस्वालला इंग्लंडला चीअर करण्यासाठी आलेल्या चाहत्यांकडून ‘स्टँडिंग ओवेशन’ मिळाले.
A STANDING OVATION BY ENGLAND FANS FOR YASHASVI JAISWAL IN VIZAG…!!!! 🫡 pic.twitter.com/eWFzlkH4zw
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 3, 2024
दरम्यान, विशाखापट्टणम कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघाने 396 धावांपर्यंत मजल मारली. शुबमन गिल 34, तर रजत पाटीदर 32 धावांचे योगदान देऊ सकले. संघातर इतर एकही फलंदाज 30 धावांची खेळी देखील करू शकला नाही. इंग्लंडसाठी जेम्स अँडरसन, रेहान अहमद आणि शोएब बशीर यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. (STANDING OVATION BY ENGLAND FANS FOR YASHASVI JAISWAL IN VIZAG)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार, कुलदीप यादव
इंग्लंड – झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रुट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, शोएब बशीर, जेम्स अँडरसन.
महत्वाच्या बातम्या –
यशस्वी जयस्वाल शो! ठोकले कारकिर्दीतील पहिले द्विशतक, वायझॅकच्या अवघड खेळपट्टीवर पाडला धावांचा पाऊस
U19 World Cup 2023 । अजिंक्य राहत भारताची उपांत्य सामन्यात धडक, इतर दोन संघांनीगी गाठली पुढची फेरी