भारत आणि इंग्लंड यांच्यातील हैदराबाद कसोटी सध्या रंगात आली आहे. तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंडने 126 धावांची आघाडी घेतली आहे. सध्या संघाने दुसऱ्या डावात 6 विकेट्सच्या नुकसानावर 316 धावा केल्या आहेत. तत्पूर्वी भारताने आपल्या पहिल्या डावाचा शेवट 436 धावांवर केला. भारतीय संघ फलंदाजी करत असताना तीन फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली. पण एकालाही अर्धशतकाचे रुपांतर शतका करता आले नाही. यादरम्यानच रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा यांच्यातील ताळमेळ बिघडल्याचेही दिसले.
भारतीय संघासाठी हैदराबाद कसोटीच्या पहिल्या डावात सलामीवीर यशस्वी जयस्वाल (80), केएल राहुल (86) आणि रविंद्र जडेजा (87) यांनी एकापेक्षा एक प्रदर्शन केले. पण तिघांपैकी एकहीजण अर्धसतकी खेळी पुढे शतकात बदलू शकला नाही. फिरकीपटू रविचंद्रन अश्विन देखील या सामन्यात मोठी खेळी करू शकत होता. पण अर्धशतक केल्यानंतर जडेजाच्या एका चुकीमुळे अश्विनला विकेट गमवावी लागली. डावातील 89व्या षटकात केएस भरत वैयक्तिक 41 धावा करून पायचित झाला. त्यानंतर अवघ्या काहीच चेंडूत 91व्या षटकात रविंचंद्रन अश्विन देखील धावबाद झाला.
अश्विनची विकेट इंग्लंडला एकप्रकारे बक्षीस मिळाली असे म्हणता येईल. यावेळी जो रुट गोलंदाजी करत असून षटकातील तिसऱ्या चेंडूवर अश्विनने एक चेंडू कव्हर्सच्या दिशेने खेळला आणि एक धाव घेण्यासाठी पळाला. नॉन स्ट्राईक एंडवरील रविंद्र जडेजा देखील सुरुवात धाव घेण्यासाठी पळाला. पण चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात पाहताच जडेजाने आपला निर्णय बदलाल आणि पुन्हा स्ट्राईकच्या दिशेने वळला. पण दुसरीकडे अश्विन मात्र नॉन स्ट्राईकच्या दिशेने धावतच होता. परिणामी चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात आणि दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवर, अशी स्थिती खेळपट्टीवर पाहायला मिळाली. विकेट वाचवण्यासाठी अश्विनच्या हातात संधी राहिली नव्हती आणि तो धावबाद झाला. विकेट गमावल्यानंतर खेळपट्टीवर अश्विन आणि जडेजामध्ये काही शब्दांची देवाणघेवाण देखील झाली. व्हिडिओत अश्विन जडेजावर नाराज दिसला.
— The Game Changer (@TheGame_26) January 26, 2024
(Ravichandran Ashwin expressed his displeasure with Ravindra Jadeja in the live match)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, केएल राहुल, केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
इंग्लंड संघ : जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड, जॅक लीच.
महत्वाच्या बातम्या –
Australia Open । आर्यना सबालेंका पुन्हा बनली टेनिस कोर्टची राणी, दुसऱ्यांदा जिंकले ग्रँड स्लॅम
IND vs ENG । तिसऱ्या दिवशी ओली पोपला मिळालं स्टँडिंग ओव्हिएशन, इंग्लंड संघ ड्रायव्हिंग सीटवर






