भारत आणि इंग्लंडयांच्यामध्ये मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये सुरु आहे. तर सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु आहे. इंग्लंडचा पहिला डाव हा चांगल्या सुरुवातीनंतर गडगडला. टीम इंडियाने आर अश्विन याच्या अनुपस्थितीत 126 धावांची दमदार आघाडी घेतली आहे. तसेच इंग्लंडचा डाव 445 धावांच्या प्रत्युत्तरात 319 धावांवर आटोपला. टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज याने 4 विकेट्स घेतल्या. तर कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर आर अश्विन आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी 1-1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली आहे.
याबरोबरच अश्विननंतर आता रवींद्र जडेजानेही इंग्लंडविरुद्ध राजकोटमध्ये खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटीत 500 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. यापूर्वी अश्विनने 500 कसोटी विकेट्स पूर्ण केले होते. तसेच आता जडेजाने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात प्रथम श्रेणीतील 500 विकेट्स पूर्ण केले आहेत. तसेच राजकोट कसोटीच्या दुसऱ्या दिवशी अश्विनने कसोटीतील 500 विकेट घेतली होती.
आता सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाने त्याची 500 वी प्रथम श्रेणी विकेट घेतली आहे. तर गोलंदाजीपूर्वी, जडेजाने फलंदाजीत देखील दमदार कामगिरी केली असून 112 धावांची शानदार शतकीय खेळी केली होती. तसेच इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत जडेजा आतापर्यंत चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे.
तसेच हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत फलंदाजी करताना जडेजाला दुखापत झाली होती.याबरोबरच जडेजाने पहिल्या डावात 5 विकेट घेतल्या आणि 87 धावा केल्या होत्या. यानंतर तो दुसऱ्या डावात 2 धावांवर रन आऊट झाला होता. यानंतर जडेजाने विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीला दुखापतीमुळे संघा बाहेर गेला होता.
त्यानंतर जडेजाने राजकोट कसोटीतून पुनरागमन करत दमदार कामगिरी केली आहे. तसेच राजकोटमध्ये प्रथम फलंदाजी करताना भारतीय अष्टपैलू खेळाडूने 112 धावा केल्या होत्या. तर गोलंदाजी करताना 2 विकेट्स देखील घेतल्या आहेत.
दरम्यान, भारताने तिसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच कर्णधार रोहित शर्माने संघाकडून सर्वात मोठी 131 धावांची खेळी केली. त्यानंतर इंग्लंडला 319 धावांवर ऑलआउट करत भारताने 126 धावांची आघाडी घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- रणजी ट्रॉफी खेळली नाही तर भोगावे लागतील वाईट परिणाम, BCCI चा खेळाडूंना थेट इशारा
- IND vs ENG : लंच-ब्रेकनंतर इंग्लंड 319 वर ऑलआऊट, टीम इंडियाकडे 126 धावांची आघाडी