---Advertisement---

Ravichandran Ashwin । 500 कसोटी विकेट्ससाठी कट्टर प्रतिस्पर्धी खेळाडूनेही केलं अश्विनचं कौतुक, पाहा व्हिडिओ

On: शुक्रवार, फेब्रुवारी 16, 2024 5:16 PM
ravichandran Ashwin
---Advertisement---

इंग्लंडविरुद्धच्या राजकोट कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विन याने मोठा विक्रम नावावर केला. अश्विन या सामन्यात कसोटी क्रिकेटमधील आपल्या 500 विकेट्स पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो केवळ दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 विकेट्सचा टप्पा पार करणारा चौथा फिरकीपटू गोलंदाज देखील ठरला. याच पार्श्वभूमीवर अश्विनचा प्रतिस्पर्धी आणि ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू नाथन लायन यानेही भारतीय दिग्गजाचे कौतुक केले.

अश्विनने शुक्रवारी आपल्या 500 कसोटी विकेट्स पूर्ण केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या फिरकी गोलंदाजांच्या यादीत अश्विन पाचव्या क्रमांकावर आहे. 517 विकेट्ससह नाथन लायन यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. येत्या काही सामन्यांमध्ये अश्विननपासून लायनला धोका देखील असू शकतो. कारण भारतीय दिग्गजाचा अनुभव आणि विकेट्स घेण्याची गती पाहता, तो या यादीत लायनला पछाडू शकतो. असे असले तरी, लायन याने 500 विकेट्स पूर्ण केल्यानंतर अश्विनचे तोंड भरून कौतुक केले.

आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून त्याने व्हिडिओ शेअर केला आहे की, “हाय ऍश (अश्विन), 500 कसोटी विकेट्स घेतल्याबद्दल खूप-खूप शुभेच्छा. तुझा हा प्रवास पाहणे म्हणजे एक अप्रतिम अनुभव होता. मझ्या हातात दुसरे काहीच नाही. पण तुझ्याविषया प्रचंड आदर आहे. त्याझा प्रतिस्पर्धी असणे, हीच बाब माझ्यासाठी खास आहे. पण मी त्याच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकत देखील असतो. या कामगिरीसाठी तुझे पुन्हा एकदा अभिनंदन आणि आगामी काळात अजून चांगले प्रदर्शन पाहायला मिळणार आहे.”

तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडची प्लेईंग ईलेव्हन – बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.

तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग ईलेव्हन – रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा.
(A message from Nathan Lyon for Ashwin for the historic landmark in Tests)

महत्वाच्या बातम्या – 
Ranji Trophy : ‘या’ इशानचं चाललंय तरी काय…? पुन्हा बीसीसीआयचा आदेश फेटाळला
राजकोट कसोटीत अश्विन अन्नाचा महाविक्रम! ठरला ‘ही’ मोठी कामगिरी करणारा केवळ दुसरा भारतीय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---