भारत आणि इंग्लंडयांच्यामधील पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने 3-1 ने मालिका खिशात घातली आहे. या मालिकेचा शेवटचा सामनाही जिंकण्याच्या मनसुब्याने टीम इंडिया मैदानात उतरताना दिसणार आहे. संपूर्ण मालिकेध्ये टीम इंडियाच्या यशस्वी जयस्वाल याने इंग्लिश गोलंदाजांचा धुराळा उडवून टाकला आहे. त्यामुळे आता पाचवा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडचे प्रयत्न असतील. असं असताना आतापर्यंत झालेल्या सामन्यात कुठे काय चुकलं याचा चांगलाच पाढा इंग्लंडच्या माजी कर्णधाराने वाचून काढला आहे.
अशातच चौथ्या कसोटी सामन्यात हिल्या डावात इंग्लंडकडे आघाडी होती. मात्र असं असूनही दुसऱ्या डावात माती खाल्ली आणि सामना हातून गमावला. दुसऱ्या डावात 46 धावांची आघाडी होती. त्यात आणखी 152 धावांची भर पडली आणि 192 धावांचं दिलं गेलं होतं. यावर बोलताना इंग्लंडचा माजी कर्णधार ज्योफ्री बायकॉट यांनी द टेलिग्राफमधील कॉलममध्ये म्हंटलं आहे की, ‘मला स्टोक्सचं कर्णधारपद आवडंत. पण मला वाटतं की त्याने दोन स्पिनर्स जो रुट आणि टॉम हार्टलेचा सुरुवातील वापर करून चूक केली. स्टोक्सला वाटलं की नवीन हार्ड बॉल चांगल्या प्रकारे उसळी घेईल. तसेच उसळी घेत स्पिनला मदत करेल.’
याबरोबरच पुढे बोलताना ज्योफ्री बायकॉट याने म्हंटलं आहे की, “नव्या चेंडूने फिरकी टाकण्याचा अनुभव आपल्या जवळ नाही. त्यामुळे चेंडू बोटातून निसटतो. त्यामुळे योग्य ठिकाणी टप्पा टाकणं कठीण होतं. जेव्हा आम्ही खेळायचो तेव्हा फिरकीपटूंना चेंडू हातात बसावा यासाठी मातीचे हाथ लावू शकत होतो. पण त्यावर निर्बंध लादले गेले आहेत. त्यामुळे त्यावर कंट्रोल करणं कठीण होतं. त्यामुळे बेन स्टोक्सने याबाबतीत जरा जास्तच विचार केला होता.”
दरम्यान, भारताने सध्या मालिका 3-1 अशी जिंकली आहे. तसेच आता इंग्लंडचा संघ आपला सन्मान वाचवण्यासाठी शेवटच्या कसोटीत उतरणार आहे. तर दोन्हीं संघांमधील शेवटचा सामना 7 मार्चपासून धरमशाला येथे खेळवला जाणार आहे. तसेच या सामन्यात दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल पाहायला मिळू शकतात. तर या सामन्यात भारतीय संघाकडून विश्रांतीवर असलेला स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह संघात पुनरागमन करू शकतो.
महत्वाच्या बातम्या –
- ICC Rankings : जयस्वालची क्रमवारीतही ‘यशस्वी‘ प्रगती; अन् गिल आणि जुरेल यांनाही झाला मोठा फायदा
- कसोटी सामन्याचे अखेरच्या क्षणी अचानक बदलले ठिकाण! कारण जाणून व्हाल थक्क