---Advertisement---

IND Vs ENG : यशस्वी जयस्वालच्या झेलवरून चाहत्यांनी बेन फोक्सला केले ट्रोल; म्हणाले, चीटर…

On: शनिवार, फेब्रुवारी 24, 2024 5:40 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. पहिल्या दिवशी निराशाजनक सुरुवातीनंतर दणक्यात कमबॅक करणाऱ्या इंग्लडने दुसऱ्या दिवशीही धमाका केला आहे. इंग्लंडने पहिल्या डावात ऑलआऊट 353 धावा केल्या. टीम इंडियाची या 353 धावांच्या प्रत्युत्तरात घसरगुंडी झाली आहे. याबरोबरच चौथ्या कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वालने पुन्हा एकदा शानदार खेळी केली आहे.

तसेच रांची कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात यशस्वी जयस्वाल फलंदाजी करत असताना इंग्लंडचा यष्टीरक्षक बेन फोक्सने झेल पकडल्याची अपील केली होती. त्यानंतर तिसऱ्या पंचांनी झेल तपासला आणि जयस्वाल नाबाद होता. कारण बेन फोक्सने हा झेल पूर्णपणे पकडला नव्हता. यानंतर चाहत्यांनीबेन फोक्सला फसवणूक करणारा म्हणत सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

याबरोबरच रांची कसोटीच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियासाठी फलंदाजी करताना यशस्वी जयस्वालने पहिल्या डावात 117 चेंडूत 73 धावा केल्या आहेत. तसेच जयस्वाल चांगली फलंदाजी करत होता. पण नंतर त्याने शोएब बशीरच्या चेंडूवर आपली विकेट गमावली आहे. मात्र त्याआधी यशस्वी जयस्वाल फलंदाजी करत असताना एक चेंडू त्याच्या बॅटला लागला आणि विकेटच्या मागे उभ्या असलेल्या बेन फॉक्सबेन फोक्सच्या ग्लोव्हजमध्ये गेला होता. तेव्हा फॉक्सनेही जोरदार अपील केली होती, मात्र, पंचांनी तपासले असता, फॉक्सच्या ग्लोव्ह्जमध्ये जाण्यापूर्वीच चेंडू जमिनीवर आदळला होता.

यानंतर बेन फोक्सच्या या अपीलवरती चाहते चांगलेच संतापले आणि फॉक्सला चीटर म्हणू लागले आहेत. तसेच अनेक युजर्सनी सोशल मीडियावर यासंदर्भात अनेक पोस्टही शेअर केल्या आहेत. एका यूजरने पोस्ट शेअर करत फॉक्स हा फसवणूक करणारा आणि इंग्लंड फसवणूक करणारा संघ असल्याचे लिहिले. तर दुसऱ्या वापरकर्त्याने कमेंट करत लिहिले आहे की, त्याला नॉट आऊट देण्यात आले कारण कोल्ह्यासमोर चेंडू उसळल्याचे स्पष्ट दिसत होते.

दरम्यान, रांची कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचे गोलंदाज भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवताना दिसले आहेत. तसेच भारतीय संघाने 177 धावांतच 7 विकेट गमावल्या होत्या. तर ध्रुव आणि कुलदीप या दोघांनी आठव्या विकेटसाठी दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 42 धावांची नाबाद भागीदारी केली. ध्रुव जुरेल 58 बॉलमध्ये 30 रन्स करुन नॉट आऊट आहे. तर कुलदीप यादव 72 चेंडूत 17 धावा करुन नाबाद आहे. तर इंग्लंडकडून 20 वर्षीय युवा शोएब बशीर याने याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---