---Advertisement---

IND vs ENG : भारतीय संघासाठी आनंदाची बातमी, तिसऱ्या सामन्यासाठी ‘हा’ खेळाडू तयार

On: बुधवार, फेब्रुवारी 14, 2024 10:04 AM
Team India test
---Advertisement---

IND vs ENG : भारत आणि इंग्लड यांच्यातील तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारी रोजी राजकोटमध्ये सुरू होणार आहे. तर या सामन्याआधी भारतीय संघ आणि चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. तसेच तिसरा कसोटी सामना जिंकून दोन्ही संघांचा मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न असणार आहे. याबरोबरच, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर हे दोघेही मालिकेतून बाहेर पडले आहेत.

15 फेब्रुवारीपासून हा सामना सुरू होणार असून त्यासाठी सर्व खेळाडू तयारीत व्यस्त आहेत. तर भारतीय संघाचा ऑलराउंडर रवींद्र जडेजा याच्याबाबत .सध्या मोठी अपडेट समोर आली आहे. तसेच रवींद्र जडेजाने 12 फेब्रुवारीपासून तिसऱ्या कसोटीसाठी जोरदार नेट्स प्रॅक्टीस करतोय. जडेजा तिसरा कसोटी सामना खेळण्यासाठी पूर्णपणे फिट आहे. अशी माहिती कुलदीप यादव याने दिली आहे.

याबरोबरच, हैदराबादमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला होता. त्यानंतर यजमान भारताने विशाखापट्टणममधील दुसरी कसोटी जिंकली. अशाप्रकारे मालिका 1-1 अशी बरोबरीत आहेत. तसेच रवींद्र जडेजा याला हैदराबादमध्ये इंग्लंड विरुद्ध पहिल्या कसोटीत दुखापत झाली होती. त्यामुळे जडेजाला विशाखापट्टणममध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बाहेर बसावे लागले होते.

दरम्यान, भारत आणि इंग्लड यांच्यातील दुसऱ्या कसोटीनंतर निवड समितीने 3 सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली असून निवड समितीने टीममध्ये रवींद्र जडेजाची निवड केली. मात्र त्याच्यासाठी फिटनेस टेस्ट ही बंधनकारक असल्याचं बीसीसीआयने आधीच स्पष्ट केलं होतं. पण अद्याप जडेजाच्या फिटनेस टेस्टबाबत बीसीसीआयने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे कुलदीपने क्रिकेट चाहत्यांना दिलेली गूड न्यूज खरंच ठरते की नाही, याकडे क्रिकेट चाहत्यांची नजर लागून राहिली आहे.

घ्या जाणून शेवटच्या 3 कसोटीसाठी भारतीय संघ :-

टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप, रवींद्र जडेजा (फिटनेसवर अवलंबून).

इंग्लंड क्रिकेट टीम | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टली, शोएब बशीर, जेम्स अँडरसन, मार्क वुड, ऑली रॉबिन्सन, डॅनियल लॉरेन्स आणि गस ऍटकिन्सन.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---