इंग्लंड संघ सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आहे. 25 जानेवारी रोजी भारत आणि इंग्लंड संघातील ही कसोटी मालिका सुरू होणार आहे. पहिल्या सामन्यासाठी दोन्ही संघ सराव करत आहे. अशातच इंग्लंड संघाची डोकेदुखी वाढवणारी एक बातमी समोर येत आहे. इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रुक वैयक्तिक कारणास्तव मायदेशी परतला आहे.
हॅरी ब्रुक (Harry Brook) याने पाच सामन्यांच्या या संपूर्ण कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. तो कसोटी मालिका खेळण्यासाठी पुन्हा भारतात येऊ शकणार नाही, असी माहिती ईसीबीकडून मिळाली आहे. धडाडीचा फलंदाज मालिकेतून बाहेर पडल्यामुळे इंग्लंडच्या बॅजबॉल स्ट्राईल खेळीवर परिणाम होऊ शकतो. डॅन लॉरेन्स (Dan Lawrence) याला ब्रुकचा बदली खेळाडू म्हणून घोषित केले गेले आहे. इंग्लंड आणि वेल्ट क्रिकेट बोर्डाने ही माहिती दिली आहे.
ईसीसीच्या माहितीप्रमाणे, “हॅरी ब्रुक वैयक्तिक कारणास्तव तत्काळ इंग्लंडला परतत आहे. तो वैयक्तिक कारणास्तव भारत दौऱ्यात इंग्लंड संघाचा भाग नसेल. ब्रुक कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी भारतात परतणार नाहीये. ब्रुकने आपल्या कुटुंबाची प्रायव्हसी ठेवण्याची विनंती केली आहे. आमचीही इच्छा आहे की, त्याच्या कुटुंबाच्या प्रायव्हसीची काळजी घेतली जावी.”
हॅरी ब्रुक इंग्लंडचा मध्यक्रमातील घातक फलंदाज आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून ब्रुक सतत चर्चेत राहिला आहे. आतापर्यंत खेळलेल्या 12 कसोटी सामन्यांमध्ये त्याने 4 शतक आणि 7 अर्धशतकांच्या मदतीने 1181 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी धावसंख्या 62.16 राहिली आहे. इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये ब्रुक दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसेल. खेळाडूंसाठी डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने त्याला 4 कोटी रुपयांमध्ये खरेदी केली. (Harry Brook out of the India Test series due to personal reasons)
महत्वाच्या बातम्या –
शोएब मलिकचा टी20 मध्ये मोठा विक्रम, आजपर्यंत एकाही आशियाई फलंदाजाला असं करता आलं नाही
‘भारताकडे ‘विराटबॉल’ आहे…’, भारतीय दिग्गजाचा कसोटी मालिकेपूर्वी इंग्लंड संघाला मोठा इशारा