मॅंचेस्टर | इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय टी-२० संघात कृणाल पांड्या आणि दीपक चहरला जखमी वॉशिंग्टन सुंदर आणि जसप्रीत बुमराह यांच्या जागी संधी मिळाली आहे.
भारतीय संघाने या इंग्लंड दौऱ्याची सुरवात मंगळवारी (३ जुलै) झालेल्या टी-२० सामन्यातील विजयाने केली.
कृणाल पांड्या आणि दीपक चहरला प्रथमच भारताच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळाले आहे. या नवख्या खेळाडूंचा फायदा घेत भारतीय संघातील जुन्या व अनुभवी खेळाडूंनी या युवा खेळाडूंबरोबर थोडी मस्करी करण्याचा प्रयत्न केला.
इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यापूर्वी ड्रेसिंग रुममध्ये कृणाल आणि दीपक चहरला त्यांची ओळख करून देण्यासाठी खुर्चीवर उभे राहून वेलकम स्पिच द्यायला लावले.
याचा वीडीओ एका चाहत्याने ट्विटरवर शेअर केला आहे.
“नाव दीपक चहर आग्र्याचा आहे पण खेळतो राजस्थानकडून. राष्ट्रीय संघातून खेळणे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न असते. ही एक वेगळीच भावना आहे.” प्रथम बोलताना दीपक चहर म्हणाला.
https://twitter.com/KSKishore537/status/1014392421935771649?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1014392421935771649&ref_url=https%3A%2F%2Fwww.jansatta.com%2Fkhel%2Find-vs-eng-india-vs-england-2nd-t20-squad-players-list-schedule-krunal-pandya-and-deepak-chahar-gave-their-intro-in-team-bus-watch-video%2F702933%2F
त्यानंतर वेळ होती हार्दिक पांड्याचा भाऊ कृणालची.
“ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे.कृणाल पांड्या फ्रॉम बडोदा, गुजरात, इंडिया.” अशाप्रकारे कृणालने त्याची ओळख करुन दिली.
https://twitter.com/KSKishore537/status/1014392539770650624?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1014392539770650624&ref_url=https%3A%2F%2Fwww.jansatta.com%2Fkhel%2Find-vs-eng-india-vs-england-2nd-t20-squad-players-list-schedule-krunal-pandya-and-deepak-chahar-gave-their-intro-in-team-bus-watch-video%2F702933%2F
या वीडीओ मध्ये भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री या दोन युवा क्रिकेटपटूंच्या स्पिचचा हसुन आनंद घेताना दिसत आहे. तसेच कृणालचा छोटा भाऊ हार्दिकचा कृणालला मधे मधे टोमने मारतानाचा आवाजही यामध्ये एेकू येतोय.
महत्त्वाच्या बातम्या-
-मेस्सी-रोनाल्डो वाद पुन्हा पेटला; दापंत्याने घेतला घटस्फोट
-विशेष मुलाखत- शिव छत्रपती पुरस्कार मिळाला की कबड्डी…