भारतीय संघाने रांचीमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा 5 विकेट्सने पराभव करत पाच सामन्यांची मालिका जिंकली आहे. तसेच इंग्लंडविरुद्धच्या या कसोटी मालिकेत भारतीय संघाने 3-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे. इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकून भारतीय संघाने मोठा विक्रम केला आहे. असे करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांच्या नावावरही हा महान विक्रम कधीच नोंदवला गेला नाही, जो भारतीय संघाने रांचीमध्ये आपल्या नावावर केला आहे.
याबरोबरच भारताचा हा मायदेशातला सलग 17 वा कसोटी मालिका विजय आहे. तर चौथ्या कसोटीत आर. अश्विन, आकाश दीप, ध्रुव जुरेल, यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांनी दमदार कामगिरी केली आहे. तसेच या सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात 353 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताने 307 धावा केल्या. दुसऱ्या डावात इंग्लंडला 145 धावात गुंडाळले. विजयासाठी 192 धावांचे आव्हान मिळाल्यावर हे आव्हान 5 विकेट्सच्या मोबदल्यात पार करत सामना आणि मालिका भारतीय संघाने खिशात घातली आहे.
अशातच नोव्हेंबर २०१२ मध्ये इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाने मायदेशात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. त्यामुळे मायदेशात सलग सर्वाधिक कसोटी मालिका जिंकण्याच्या बाबतीत भारतीयसंघानंतर ऑस्ट्रेलियाचा क्रमांक लागतो. मायदेशात सलग 10 कसोटी मालिका दोनदा जिंकणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला संघ आहे. तसेच मायदेशात झालेल्या गेल्या 50 कसोटी सामन्यांमध्ये भारताने केवळ 4 सामने गमावले आहेत. यामुळे भारतीय कसोटी संघासाठी संपूर्ण भारत हा बालेकिल्ला बनला आहे.
घ्या जाणून भारतीय संघाने आत्तापर्यत जिंकलेल्या 17 कसोटी मालिका पुढीलप्रमाणे :-
1. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत – भारतीय संघाने कसोटी मालिका 4-0 ने जिंकली (4) (2013)
2. वेस्ट इंडिज विरुद्ध भारत – भारतीय संघाने कसोटी मालिका 2-0 (2) (2013) जिंकली
3. दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत – भारतीय संघाने कसोटी मालिका 3-0 ने जिंकली (4) (2015)
4. न्यूझीलंड विरुद्ध भारत – भारतीय संघाने कसोटी मालिका 3-0 ने जिंकली (3) (2016)
5. इंग्लंड विरुद्ध भारत – भारतीय संघाने कसोटी मालिका 4-0 ने जिंकली (5) (2016)
6. बांगलादेश विरुद्ध भारत – भारतीय संघाने कसोटी मालिका 1-0 (1) (2017) जिंकली
7. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत – भारतीय संघाने कसोटी मालिका 2-1 (4) (2017) जिंकली
8. श्रीलंका विरुद्ध भारत – भारतीय संघाने कसोटी मालिका 1-0 ने जिंकली (3) (2017)
9. अफगाणिस्तान विरुद्ध भारत – भारतीय संघाने कसोटी मालिका 1-0 ने जिंकली (1) (2018)
10. वेस्ट इंडिज विरुद्ध भारत – भारतीय संघाने कसोटी मालिका 2-0 (2) (2018) जिंकली
11. दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत – भारतीय संघाने कसोटी मालिका 3-0 ने जिंकली (3) (2019)
12. बांगलादेश विरुद्ध भारत – भारतीय संघाने कसोटी मालिका 2-0 ने जिंकली (2) (2019)
13. इंग्लंड विरुद्ध भारत – भारतीय संघाने कसोटी मालिका 3-1 (4) (2021) ने जिंकली
14. न्यूझीलंड विरुद्ध भारत – भारतीय संघाने कसोटी मालिका 1-0 ने जिंकली (2) (2021)
15. श्रीलंका विरुद्ध भारत – भारतीय संघाने कसोटी मालिका 2-0 (2) (2022) जिंकली
16. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत – भारतीय संघाने कसोटी मालिका 2-1 (4) (2023) ने जिंकली
17. इंग्लंड विरुद्ध भारत – भारतीय संघाने 3-1 (5) ने आघाडीवर आहे (1 सामना बाकी – 2024)
महत्वाच्या बातम्या –
- IND Vs ENG : इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकताच विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाला,”युवा…
- IND Vs ENG : रोमहर्षक सामन्यात मालिका भारताच्या खिशात, जाणून घ्या विजयाचे 5 ठळक मुद्दे