भारत आणि इंग्लंडयांच्यामधील कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्याला काही दिवस बाकी आहेत. बेन स्टोक्सच्या नेतृत्त्वाखाली इंग्लंड संघ अपयशी ठरला आहे. आतापर्यंत झालेल्या चार कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंड संघाला फक्त एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे. या सामन्याआधी इंग्लंड संघाचा दिग्गज खेळाडू जेम्स अँडरसन याने टीम इंडियाच्या एका खेळाडूला पाहत मी गोलंदाजीमध्ये बदल केले असल्याचं म्हटलं आहे.
याबरोबरच वयाच्या 41 व्या वर्षांतही इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजीची धुरा वाहत असलेला जेम्स अँडरसन सर्वाधिक कसोटी विकेट मिळवणाऱ्या गोलंदाजांमध्ये मुथय्या मुरलीधरन आणि शेन वॉर्न यांच्यापेक्षा थोडासा मागे आहे, पण वेगवान गोलंदाजांमध्ये त्याने मिळवलेल्या विकेट सर्वाधिक आहेत. मी झहीर खानची गोलंदाजी बारकाईने पाहायचो. त्यातून बरेच काही शिकलो. रिव्हर्स स्विंग कसा करायचा. तसेच रिव्हर्स स्विंग करताना चेंडू हातामध्ये कसा लपवायचा. जेव्हा जेव्हा झहीर खानविरुद्ध खेळायचो तेव्हा या गोष्टींकडे मी बारकाईने लक्ष ठेवायचो, असे अँडरसनने सांगितले आहे.
तसेच इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन जवळपास 21 वर्षांपासून कसोटी क्रिकेट खेळत आहे. त्याने 2003 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध कसोटी पदार्पण केले. तेव्हापासून तो इंग्लंडच्या कसोटी संघाचा महत्त्वाचा भाग आहे. तर झहीर खानने 2014 मध्ये भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यावेळी जेम्स अँडरसन त्याच्या गोलंदाजीवर लक्ष ठेवून होता.
त्यानंतर दुसऱ्या कसोटीत बुमराच्या मॅचविनिंग कामगिरीबाबत विचारले असता अँडरसन म्हणाला, ‘‘बुमरासारख्या गोलंदाजांनी एक वेगळी उंची निर्माण केलेली आहे. भारतात रिव्हर्स स्विंगचे महत्त्व फारच अधिक आहे आणि त्यामध्ये बुमराने हुकूमत मिळवलेली आहे, त्याच्याकडे वेग आणि अचूकताही अफलातून आहे.’’
James Anderson said "Zaheer Khan was someone I used to watch a lot to try & learn from – how he used the reverse swing, how he covered the ball – that is something I tried to sort of develop on the back of playing against him". [JioCinema] pic.twitter.com/MlEZHH21SY
— Johns. (@CricCrazyJohns) February 28, 2024
दरम्यान, 41 वर्षीय वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत 186 कसोटी सामने खेळले असून त्याने कसोटीत 698 विकेट्स घेतल्या आहेत आणि 700 चा टप्पा गाठण्यापासून तो फक्त 2 विकेट्स दूर आहे. त्यानंतर कसोटीत 700 विकेट्स घेणारा तो जगातील पहिला वेगवान गोलंदाज ठरेल. मात्र, त्याच्याआधी श्रीलंकेचा माजी फिरकीपटू आणि ऑस्ट्रेलियाचा दिवंगत लेगस्पिनर शेन वॉर्नने कसोटीत 700 विकेट्स टप्पा गाठला होता.
महत्वाच्या बातम्या –
- BCCI कडून वार्षिक करार जाहीर, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि शिखर धवनचं काय?
- WPL 2024 : सोलापूरच्या किरण नवगिरेसमोर मुंबई इंडियन्सची बत्ती गूल, यूपी वॉरियर्सला मिळाला हंगामातील पहिला विजय