---Advertisement---

IND vs ENG । भारताविरुद्ध जो रुटचं 10वं कसोटी शतक! महान फलंदाजांना न जमलेली कामगिरी केली नावावर

On: शुक्रवार, फेब्रुवारी 23, 2024 4:25 PM
Joe-Root-Record
---Advertisement---

जो रुट शुक्रवारी (23 फेब्रुवारी) फॉर्ममध्ये दिसला. इंग्लंड संघ पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आहे. मालिकेतील चौथा सामना शुक्रवारी रांचीमध्ये सुरू झाला. नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण भारतीय गोलंदाजांनी पहिल्याच सत्रात इंग्लंडला अडचणीत टाकले. संघ धावा करण्यासाठी झगडत असताना रुट केलेले शतक खऱ्या अर्थाने सामन्याला कलाटणी देणारे ठरू शकते.

जो रुट (Joe Root) याने कसोटी कारकिर्दीतील आपले 31 वे शतक शुक्रवारी रांचीमध्ये साकारले. 219 चेंडूत त्याने हे शतक पूर्ण केले. यात 9 चौकारांचा समावेळ होता. जून 2023 नंतर रुटच्या बॅटमधून आलेले हे पहिले शतक आहे. दरम्यानच्या काळात त्याने दोन अर्धशतके केली. पण इतर सर्व वेळा तो स्वस्तात बाद झाला. रुटचे हे शतक इंग्लंड संघासाठी चांगले संकेत आहेत. कारण भारताविरुद्धच्या या कसोटी मालिकेत रुटचा फॉर्म महत्वाचा आहे.

जो रुट भारताविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतके करणारा फलंदाज देखील ठरला. रांचीमध्ये खेळताना त्याने कारकिर्दीत भारताविरुद्ध 10वे कसोटी शतक केले. याआधी स्टीव स्मिथ आणि रुट यांनी प्रत्येकी 9-9 कसोटी शतके भारताविरुद्ध केली होती. पण शुक्रवारी रुट भारताविरुद्ध 10 कसोटी शतके करणारा पहिला फलंदाज ठरला.

संघाची धावसंख्या 47 अशताना सलामीवीर बेन डकेट आणि ओली पोप यांनी विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर जो रुट खेळपट्टीवर आला. पुडे संघाची धावसंख्या 112 असताना पहिल्याच सत्रात इंग्लंडच्या पच महत्वपूर्ण विकेट्स गेल्या होत्या. पण त्यानंतर सहाव्या विकेटसाठी रुटने बेन फोक्स याच्यासोबत 113 धावांची भागीदारी केली. पहिल्या दिवसाखेर इंग्लंडची धावसंख्या 7 विकेट्सच्या नुकसानावर 302 धावा आहे. (Joe Root is the first player in Test history to smash 10 Hundreds against India.)

रांची कसोटीसाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
इंग्लंड: झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), टॉम हार्टले, ऑली रॉबिन्सन, शोएब बशीर, जेम्स अँडरसन

भारत: यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, आकाश दीप (पदार्पण), कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.

महत्वाच्या बातम्या – 
IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का,आयपीएलच्या पहिल्या हाफमधून ‘हा’ स्टार खेळाडू बाहेर
IPL 2024 : आकाश चोप्राचे खळबळजनक वक्तव्य, म्हणाला ‘MI-GT सामन्यादरम्यान हार्दिक पांड्याला…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---