---Advertisement---

IND vs ENG : महेंद्रसिंग धोनीचे रांची कसोटी दरम्यान व्हायरल झाले पहिले नियुक्ती पत्र, पाहा फोटो

On: सोमवार, फेब्रुवारी 26, 2024 10:35 AM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना रांचीच्या मैदानावर सध्या सुरू आहे. तसेच रांची कसोटी सुरू असताना अचानक भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची चर्चा रंगली आहे. कारण रांची हे माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे मूळ गाव आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील रांची कसोटी सामन्यादरम्यान महेंद्रसिंग धोनीचे पहिले नियुक्ती पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

याबरोबरच महेंद्रसिंग धोनी टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्यापूर्वी दक्षिण पूर्व रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर म्हणून काम करत होता. यानंतर महेंद्रसिंग धोनीने देशासाठी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिकीट कलेक्टरची नोकरी सोडली होती. यानंतर महेंद्रसिंग धोनीने 23 डिसेंबर 2004 रोजी बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. मात्र सध्या धोनीचे नियुक्ती पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अशातच धोनीने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या मालिकेत विशेष असं काही करू शकला नव्हता. पण पुढच्या पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत विशाखापट्टणममधील त्याच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात त्याने 123 चेंडूत 148 धावा केल्या होत्या. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीने भारतासाठी 350 एकदिवसीय सामन्यांमध्ये 50.57 च्या सरासरीने 10773 धावा केल्या आहेत ज्यात 10 शतके आणि 73 अर्धशतकांचा समावेश आहे. यामध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या म्हणजे नाबाद 183 धावा आहे.

महेंद्रसिंग धोनीने भारतासाठी 90 कसोटी सामन्यांमध्ये 38.09 च्या सरासरीने 4876 धावा केल्या आहेत. ज्यात 6 शतके आणि 33 अर्धशतकांचा समावेश आहे. या काळात त्याची सर्वोत्तम धावसंख्या 224 धावा होती. धोनीने भारतासाठी 98 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 37.60 च्या सरासरीने 1617 धावा केल्या आहेत ज्यात 2 अर्धशतकांचा समावेश आहे.

दरम्यान, महेंद्रसिंग धोनीने 2008 साली भारतीय संघाचे कर्णधारपद स्वीकारले होते. त्यानंतर धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने ICC 2007 T20 विश्वचषक, 2011 एकदिवसीय विश्वचषक आणि ICC चॅम्पियन्स ट्रॉफी (2013) जिंकली आहे. याशिवाय 2009 मध्ये भारत प्रथमच कसोटीत नंबर वन बनला होता. पण 2020 मध्ये धोनीने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---