लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळल्या जात असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाने आर अश्विनला पुन्हा एकदा प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले नाही. लॉर्ड्स कसोटीसाठी इंग्लंडने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले, तर भारताने फक्त एक. इशांत शर्माला दुखापतग्रस्त शार्दुल ठाकूरच्या जागी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. नाणेफेकीनंतर दोन्ही संघांनी आपली प्लेइंग इलेव्हन घोषित करताच मायकेल वॉनने ट्विटरवर इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन योग्य का आहे आणि भारताची प्लेइंग इलेव्हन का चुकीची आहे? हे स्पष्ट केले.
मायकेल वॉनने लिहिले की, “इंग्लंडने योग्य संघ निवडला आणि भारताने तसे केले नाही असे दिसते. अश्विनला त्याच्या फलंदाजी आणि दर्जेदार गोलंदाजीसाठी संघात समाविष्ट करायला हवे होते. तो सर्व परिस्थितीमध्ये चांगली गोलंदाजी करतो, गोलंदाजीसाठी योग्य दिवस आहे असे वाटते की बऱ्याच विकेट पडतील.”
दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलताना इंग्लंडने जॅक क्रॉली, स्टुअर्ट ब्रॉड आणि डॅन लॉरेन्सच्या जागी हसीब हमीद, मार्क वुड आणि मोईन अली यांचा समावेश केला आहे. लॉर्ड्समध्येही पावसाचा त्रास झाला, ज्यामुळे नाणेफेकीला उशीर झाला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Feels like England have picked the right team & India haven’t … Ashwin should have played for India to give them more Batting plus his quality bowling … He bowls well in all conditions … Perfect bowling day … Feels like a wickets day … #ENGvIND
— Michael Vaughan (@MichaelVaughan) August 12, 2021
भारताची प्लेइंग इलेव्हन:
केएल राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रीषभ पंत, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज.
इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन:
रोरी बर्न्स, डोम सिबली, हसीब हमीद, जो रूट (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, मोईन अली, सॅम कुरन, ओली रॉबिन्सन, मार्क वुड, जेम्स अँडरसन.
महत्त्वाच्या बातम्या-
जेम्स अँडरसनचा आणखी एक कीर्तिमान; ‘अशी’ कामगिरी करणारा बनला एकमेव वेगवान गोलंदाज
लॉर्ड्सवरील शतकाचे रोहितचे स्वप्न भंगले, अँडरसनच्या लाजवाब चेंडूने केला घात, पाहा व्हिडिओ
‘रा-रा’ जोडीची कमाल! शतकी भागिदारी करत तब्बल ४७ वर्षांच्या प्रतिक्षेवर लावला अंकुश