आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी इंग्लंडचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका आणि 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाईल. या मालिकेची सुरुवात 22 जानेवारी रोजी पहिल्या टी20 सामन्यानं होणार आहे. इंग्लंडनं टी20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. मात्र बीसीसीआयनं अद्याप टीम इंडियाची घोषणा केलेली नाही.
टी20 मालिकेतील सामने कोलकाता, चेन्नई, राजकोट, पुणे आणि मुंबई येथे खेळले जातील. तर एकदिवसीय सामने नागपूर, कटक आणि अहमदाबाद येथे होतील. ही टी20 मालिका 22 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान खेळली जाईल. यानंतर एकदिवसीय मालिका 6 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान खेळली जाईल. टी20 मालिकेतील सामने संध्याकाळी सात वाजता सुरू होतील. तर एकदिवसीय मालिकेतील सामने दुपारी 1:30 वाजता सुरू होणार आहेत.
भारत आणि इंग्लंड टी20 मालिकेचं वेळापत्रक
22 जानेवारी – पहिला टी20, कोलकाता (सायंकाळी 7 वाजता)
25 जानेवारी – दुसरा टी20, चेन्नई (सायंकाळी 7 वाजता)
28 जानेवारी – तिसरा टी20, राजकोट (सायंकाळी 7 वाजता)
31 जानेवारी – चौथा टी20, पुणे (सायंकाळी 7 वाजता)
2 फेब्रुवारी – पाचवा टी20, मुंबई (सायंकाळी 7 वाजता)
भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
6 फेब्रुवारी – पहिला एकदिवसीय सामना, नागपूर (दुपारी 1.30 वाजता)
9 फेब्रुवारी – दुसरा एकदिवसीय सामना, कटक (दुपारी 1.30 वाजता)
12 फेब्रुवारी – तिसरा एकदिवसीय सामना, अहमदाबाद (दुपारी 1.30 वाजता)
टी20 मालिकेसाठी इंग्लंडचा संघ – जोस बटलर (कर्णधार आणि यष्टीरक्षक), फिल साल्ट, जेमी स्मिथ, हॅरी ब्रूक, बेन डकेट, जेकब बेथेल, लियाम लिव्हिंगस्टोन, रेहान अहमद, जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, गस अॅटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वूड आणि साकिब महमूद
एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंडचा संघ – जोस बटलर (कर्णधार आणि यष्टीरक्षक), फिल साल्ट, जेमी स्मिथ, हॅरी ब्रूक, बेन डकेट, जो रूट, जेकब बेथेल, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, गस अॅटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वूड आणि साकिब महमूद
हेही वाचा –
भारताचा स्टीव्ह स्मिथ? तरुण फलंदाजाने केली हुबेहूब नक्कल; व्हायरल VIDEO नक्की पाहा
“गौतम गंभीरने एकट्याने आयपीएल जिंकवले नाही, पण सगळं श्रेय त्याला मिळालं”; माजी खेळाडू बरसला
अनुभवी फिरकीपटूचा विजय हजारे ट्रॉफीत जलवा! भारतीय संघात पुन्हा संधी मिळणार का?