---Advertisement---

IND Vs ENG : तिसऱ्या कसोटीत सरफराज खानच्या वडीलांच्या ‘जॅकेट’ची सर्वत्र चर्चा, दिला जगाला खास संदेश

On: गुरूवार, फेब्रुवारी 15, 2024 3:40 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी आजपासून राजकोटच्या निरंजन शहा स्टेडियमवर सुरू आहे. तसेच आज भारतीय संघाकडून दोन खेळाडूंनी कसोटी पदार्पण देखील केलं आहे. यामध्ये मुंबईचा मधल्या फळीतील फलंदाज सर्फराज खान आणि उत्तर प्रदेशचा विकेटकिपर ध्रुव जुरेल यांना आज पदार्पणाची कॅप देण्यात आली.

याबरोबरच सर्फराज खानने गेल्या काही वर्षापासून रणजी ट्रॉफीत धावांचा पाऊस पाडला आहे. तसेच प्रत्येक हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी करून देखील सर्फराजसाठी टीम इंडियाचे दार उघडत नव्हते. तर  प्रत्येक संघनिवडीवेळी त्याची चर्चा व्हायची मात्र त्याला अनेकवेळा डावलले गेले आहे. मात्र आज अखेर इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत त्याचा प्लेईंग 11 मध्ये खेळण्याची संधी दिली आहे.

यानंतर अनिल कुंबळेकडून कॅप घेतल्यानंतर सरफराज थेट त्याच्या वडिलांकडे गेला आहे. त्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला मिठी मारली होती. यानंतर वडील नौशाद यांच्या जॅकेटची सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे. मात्र जेव्हा सरफराज आणि त्याचे वडील मिठी मारत होते, तेव्हा त्याच्या वडिलांच्या जॅकेटच्या मागे एक खास संदेश लिहिलेला दिसत होता.

https://twitter.com/sagarqinare/status/1757973779727233523

 

दरम्यान, सरफराज आणि त्याचे वडील मिठी मारत होते, तेव्हा त्याच्या वडिलांच्या जॅकेटच्या मागे ‘Cricket Is Everyone’s Game’ असा संदेश लिहिलेला दिसत होता. याबरोबरच, सरफराज खानने खूप मेहनत घेतली असून त्याचे वडील नौशाद यांनाही क्रिकेटर बनायचे होते. पण पदार्पणाची कॅप मिळाल्यानंतर सरफराज खानच्या वडिलांनीही कर्णधार रोहित शर्माची भेट घेतली आणि रोहितनेही त्याना मिठी मारली असून त्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1757992718650003570

 

याबरोबरच, सरफराज खानचा धाकटा भाऊ सरफराजप्रमाणेच मुशीरही खूप प्रतिभावान खेळाडू आहे. अलीकडेच, अंडर-19 विश्वचषक 2024 मध्ये, मुशीर खानने भारतीय संघासाठी आपली प्रतिभा दाखवत त्याने 300 हून अधिक धावा केल्या आहेत.

https://twitter.com/Jay_Cricket18/status/1756699327219777544

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---