भारतीय संघाने इंग्लड विरूद्ध चा चौथा कसोटी सामना जिंकत 5 सामन्यांची मालिका 3-1 ने लॉक केली आहे. इंग्लंडने विजयासाठी दिलेलं 192 धावांचं आव्हान हे टीम इंडियाने चौथ्या दिवशी 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं आहे. तसेच या विजयासह भारताने 5 सामन्यांच्या मालिकेवरही कब्जा केला आहे. या मालिकेतील आतापर्यंत 4 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी 3 सामने भारताने जिंकले आहेत.
याबरोबरच दुसऱ्या दिवसाच्या खेळापर्यंत इंग्लंड सामना जिंकेल असे अनेकांना वाटत होते. मात्र सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने शानदार पुनरागमन करत इंग्लंडला बॅकफूटवर ढकलले. अशा स्थितीत भारताने हरलेल्या सामन्यात पुनरागमन कसे केले हा मोठा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. त्या बद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
रांची कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पहिल्या डावात इंग्लंडने शानदार फलंदाजी देखील केली होती. त्यामुळे भारताविरुद्ध 10 विकेट गमावून 353 धावा संख्या केली. तसेच या डावात इंग्लंडचा दिग्गज खेळाडू जो रूटने शानदार शतक झळकावले आणि तो नाबाद राहून पॅव्हेलियनमध्ये परतला. पण भारताच्या आकाश दीपने या डावात अप्रतिम गोलंदाजी करत इंग्लंडच्या 4 खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यात त्याला यश मिळाले होते.
An unbeaten 72*-run partnership between @ShubmanGill & @dhruvjurel21 takes #TeamIndia over the line!
India win the Ranchi Test by 5 wickets 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/FUbQ3MhXfH#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ORJ5nF1fsF
— BCCI (@BCCI) February 26, 2024
याशिवाय रवींद्र जडेजाने या डावातही त्याने चांगली गोलंदाजी करत 4 खेळाडूंना बाद केले. या दोन गोलंदाजांच्या कामगिरीमुळे इंग्लंडचा संघ 353 धावांवर गारद झाला होता. त्यानंतर इंग्लंडच्या 353 धावांच्या प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. भारतीय फलंदाज एकामागून एक विकेट गमावत राहिले. मात्र या वेळी ध्रुव जुरेलने 90 धावांची खेळी केली. जुरेलने या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकारही मारले होते. तसेच जुरेलची ही खेळी कठीण काळात आली होती. त्यामुळे या खेळीचे महत्त्व शतकापेक्षा जास्त आहे. कारण जुरेलच्या या खेळीमुळे भारतीय संघाल पहिल्या डावात 300 पेक्षा जास्त धावा करता आल्या होत्या.
An impressive 5⃣0⃣-run stand 👌 👌
Shubman Gill 🤝 Dhruv Jurel
Follow the match ▶️ https://t.co/FUbQ3Mhpq9 #TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/XySme4pdMB
— BCCI (@BCCI) February 26, 2024
याबरोबरच जुरेलने दुसऱ्या डावातही भारतीय संघाला विजय अवघड जाईल असे वाटत होते, मात्र जुरेलने पुन्हा एकदा डावाची धुरा सांभाळली आणि 39 धावांची खेळी केली. तो विजयाचा तिसरा प्रमुख घटक म्हणून पुढे आला आहे. जुरेलशिवाय कर्णधार रोहित शर्मा आणि स्फोटक फलंदाज शुभमन गिल यांनीही शानदार अर्धशतकी खेळी खेळली केल्या आहेत.
After solid resistance with the bat, Shubman Gill clears the ropes twice and brings up his FIFTY! 😎#TeamIndia only 2 runs away from a win in Ranchi!
Follow the match ▶️ https://t.co/FUbQ3MhXfH#INDvENG | @IDFCFIRSTBank | @ShubmanGill pic.twitter.com/zahlGUrYQG
— BCCI (@BCCI) February 26, 2024
दरम्यान, दुसऱ्या डावात इंग्लंडला भारताच्या गोलंदाजांनी सावरण्याची जराशीसुद्ध संधी दिली नाही. त्यामुळे दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ अवघ्या 145 धावांवर आटोपला होता. त्यामुळे भारताला विजयासाठी केवळ 192 धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. यावेळी भारताचे फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि कुलदीप यादव यांनी इंग्लंडच्या दुसऱ्या डावात शानदार गोलंदाजी केली असून या डावात अश्विनने 5 विकेट्स घेतले, तर कुलदीपनेही 4 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- IND Vs ENG : रांची कसोटीत ध्रुव जुरेल ठरला विजयाचा ‘हिरो’, अन् वाढल्या पंत-इशानच्या अडचणी
- IND vs ENG : गिलचे सॉलिड अर्धशतक, भारताचा इंग्लंडवर 5 विकेट्सने दमदार विजय