डोळ्यात तेल टाकून क्रिकेट रसिक भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यादरम्यान होणाऱ्या कसोटी सामन्यांची वाट पाहात आहेत. ४ सामन्यांची ही कसोटी मालिका सुरू होण्यासाठी अवघ्या आठवड्याभराचा कालावधी उरला आहे. मात्र अद्यापही ब्रिटिनचे चाहते कोणत्या टिव्ही चॅनलवर भारत-इंग्लंड सामने पाहू शकतील? याचा निर्णय झालेला नाही. क्रिकेट सामन्यांचे अधिकृत प्रसारक स्टार इंडिया हॉटस्टार ऍपद्वारे या सामन्यांचे थेट प्रसारण करण्याच्या विचारात आहेत.
माध्यमांतील वृत्तांनुसार, भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाच्या भूमीतील थरारक विजय सोबतच इंग्लंडने श्रीलंकाचा केलेला व्हाईटवॉश यामुळे स्काय स्पोर्ट्स चॅनलवरील दर्शकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे प्रसारक स्टार इंडिया स्काय स्पोर्ट्स चॅनलला भारत-इंग्लंड सामन्यांचे अधिकार विकण्याची शक्यता वाढली आहे. तसेच चॅनल ४ देखील याबाबत प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. या अधिकारांची किंमत जवळपास २ कोटी पौंड इतकी आहे.
स्काय स्पोर्ट्स चॅनल हे अधिकार मिळवण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे. मागील २ दशकांपासून इंग्लंडच्या अधिकतर सामन्यांचे प्रसारण स्काय स्पोर्ट्स चॅनलवर करण्यात आले आहे. त्यामुळे आता हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल की, नक्की स्टार इंडिया कोणत्या टिव्ही चॅनलला भारत-इंग्लंड सामन्यांचे थेट प्रसारण करण्याचे अधिकार देईल?
पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठीचा भारत संघ
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, केएल राहुल, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत हार्दिक पंड्या, रिद्धीमान साहा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव
पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठीचा इंग्लंड संघ
जो रूट (कर्णधार), जोफ्रा आर्चर, मोईन अली, जेम्स एंडरसन, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जॅक क्राउले, बेन स्टोक्स, टेन लॉरेंस, जॅक लीच, डॉम सिब्ले, बेन फोक्स, ओली स्टोन, क्रिस वोक्स
महत्त्वाच्या बातम्या-
IND Vs ENG: तेंडूलकर, द्रविड यांच्या ‘मोठ्या’ विक्रमावर विराटची नजर; करावी लागतील फक्त २ शतके