टी20 विश्वचषक 2022चा दुसरा उपांत्य फेरीचा सामना भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना गुरूवारी (10 नोव्हेंबर) ऍडलेडच्या ओव्हल मैदानावार खेळला जाणार आहे. या महत्वाच्या सामन्यासाठी दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन काय असेल याची चर्चा सध्या सुरू आहे. असे असताना आयसीसीने या सामन्यात कोण पंच असतील याची यादी जाहीर केली आहे. त्यातील एक नाव पाहून तर भारतीय चाहत्यांनी घामच फुटणार आहे.
आयसीसीने भारत विरुद्ध इंग्लंड उपांत्य सामन्यासाठी मैदानात पंच म्हणून कुमार धर्मसेना (Kumar Dharmasena) आणि पॉल रेफेल यांची निवड केली आहे. तसेच ख्रिस गॅफनी हे थर्ड अंपायर, रॉड टकर फोर्थ अंपायर आणि डेविड बून यांना मॅच रेफरी या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.
या यादीमध्ये कुमार धर्मसेना यांचे नाव पाहून चाहत्यांनी त्यांना ट्रोल केले आहे. त्यातील एकाने धर्मसेनांना पक्षपाती पंच म्हटले आहे, तर काहींनी ते या सामन्यात पंच असल्याने इंग्लंडचा विजय पक्का असे ट्वीट केले आहे.
2019च्या विश्वचषकात दिला होता चुकीचा निर्णय
2019च्या वनडे विश्वचषकाचा अंतिम सामना न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळला गेला. या सामन्यादरम्यान धर्मसेना यांनी एक निर्णय दिला होता, ज्याने अनेक वाद निर्माण झाले होते. ज्याचे नुकसान न्यूझीलंडच्या संघाला भोगावे लागले. त्यांनी हा सामना गमावला हे सर्वाना परिचीत आहेच.
न्यूझीलंडचा संघ गोलंदाजी करत असताना इंग्लंडच्या डावातील 50वे षटक सुरू होते. ट्रेंट बोल्ट ते षटक टाकायला आला असताना क्रिझवर बेन स्टोक्स आणि मार्क वूड उपस्थित होते. या षटकातील चौथ्या चेंडूवर स्टोक्स याने 2 धावा घेतल्या, मात्र मार्टिन गप्टिल याने तो फुलटॉस चेंडू अडवत थ्रो केला जो स्टोक्सच्या बॅटला लागून सीमारेषेपार गेला. याच चेंडूवर पंच धर्मसेना 6 धावा दिल्या, ज्यामुळे सामना सुपर ओव्हरचा झाला आणि न्यूझीलंड पराभूत झाला.
नियमाच्या वहित पाहिले तर त्यावेळी धर्मसेनांनी तेव्हा 6 ऐवजी 5 धावा दिल्या पाहिजे होत्या, मात्र त्यांचा निर्णय चुकला आणि त्याची मोठी किंमच न्यूझीलंडला मोजावी लागली. त्यांच्या या एका निर्णयामुळे ते आजही क्रिकेटविश्वात ट्रोल होत आहेत. तसेच त्यावर्षी त्यांना आयसीसीने त्या वर्षाचा सर्वोत्तम पंच म्हणून पुरस्कृत केले होते.
https://twitter.com/Cloudy_popa/status/1589517122883182592?s=20&t=zhdwIrj0VLQnjkL5u8_Ykw
Another ill legal trophy loading for England
— ashim (@RoFiedAshim) November 7, 2022
भारत विरुद्ध इंग्लंड टी20 विश्वचषक उपांत्य फेरीसाठी पंच:
कुमार धर्मसेना आणि पॉल रीफेल (मैदानावर)
ख्रिस गॅफनी (थर्ड अंपायर)
रॉड टकर (चौथा पंच)
डेविड बून (मॅच रेफ्री)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वाईट काळात केवळ ‘या’ व्यक्तीने वाढवला विराटचा आत्मविश्वास; स्वतः केला खुलासा
भारतासाठी आनंदाची बातमी, इंग्लंडचा ‘हा’ स्फोटक खेळाडू मुकणार सेमीफायनलला!