भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएसन स्टेडियमवर आयोजित केला जात आहे. 15 फेब्रुवारी रोजी उभय संघ एकमेकांविरुद्ध खेळतील. पण हा सामना सुरू होण्याच्या एक दिवस आधी राजकोटमधील या स्टेडियमला नवीन नाव मिळणार आहे. स्वतः बीसीसीआय सचिव जय शहा या नव्या नावाचे अनावरण करतील.
राजकोट स्थित सौराष्ट्र क्रिकेट असोसिएसन स्टेडियमचे नाव आता बदलले जाणार आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांच्या उपस्थितीत 14 फेब्रुवारी रोजी या स्टेडियमला नवीन नाव दिले जाईल. माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू आणि अनुभवी प्रशासक निरंजन शाह यांच्या नावाने आता हे स्टेडियम ओळखले जाईल. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव हिमांश शाह यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली.
हिमांशी यांनी असे सांगितले की, “जय शाह नवीन नावाचे अनावरण करतील. आम्ही या कार्यक्रमासाठी बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही निमंत्रण पाठवले आहे. काही दिवसच आम्ही आमंत्रित केलेल्या सर्व नामांकीत व्यक्ती आणि पदाधिकाऱ्यांकडून आम्हाला पुष्टी (उपस्थितीची) मिळेल.” या कार्यक्रमावेळी भारत आणि इंग्लंड संघाचे खेळाडू स्टेडियममध्ये सराव करत असतील. हिमांशू यांना अपेक्षा आहे की, हे खेळाडू देखील स्टेडियमला नवीन नाव देताना कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील.
“अजून याची पुष्टी झाली नाहीये, पण निमंत्रण पाठवले आहे. आम्हाला आपेक्षा आहे की, खेळाडू कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील.” 79 वर्षीय निरंजन शाह यांनी 1965-66 ते 1975-76 दरम्यान सौराष्ट्रसाठी 12 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. ते सुमारे 40 वर्ष एमसीएचे सचिव राहिले आहेत. एकदा त्यांनी बीसीसीआयचे सचिवपद देखील भूषवले आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या अध्यक्षपदीही त्यांनी कार्यभार सांभाळला आहे. याच कारणास्तव त्यांना एक कुशल प्रशासक म्हटले जाते. स्टेडियमचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मागच्या वर्षी एससीएच्या वार्षीक सर्वसाधान सभेत मांडला गेला होता. (Rajkot Stadium will get a new name on February 14)
महत्वाच्या बातम्या –
पंचांकडून लाईव्ह सामन्यात गडबड! निर्णय असा दिला की, गोलंदाजी करणाऱ्या संघालाच पडला प्रश्न
जसप्रीत जसबीर सिंग बुमराह! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘हा’ कारणामा पहिल्यांदाच, हलवली अख्खी ICC Ranking