भारताने इंग्लंडविरुद्धची चौथा कसोटी सामना जिंकत मालिका खिशात घातली आहे. तसेच पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना जिंकत भारतीय संघाने सध्या मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी देखील घेतली आहे. तसेच चौथ्या सामन्यात भारताची नाजूक स्थिती होती. यासह टीम इंडियाने घरच्या भूमीवर सलग 17 वी कसोटी मालिका जिंकली आहे. तसेच भारतीय संघाच्या या विजयात युवा खेळाडूंचा खूप मोठा वाटा होता. कारण भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली या मालिकेत नव्हता. तर मोहम्मद शमीही दुखापतीमुळे बाहेर आहे. तरीही युवा खेळाडूंनी आपले पराक्रम दाखवून इंग्लंडचा चा पराभव केला आहे. तसेच या विजयानंतर मालिकेत पहिल्यांदाच विराट कोहलीची प्रतिक्रिया समोर आली आहे.
याबरोबरच विराट कोहलीने भारतीय संघाच्या विजयानंतर त्याच्या ट्टिटर हँडलवर पोस्ट करत त्याने लिहिले आहे की, “आमच्या युवा संघाचा हा शानदार मालिका विजय आहे. सर्व खेळाडूंनी आपली चमकदार कामगिरी दाखवली आणि आपल्या जिद्दीने संघाला मोठा विजय मिळवून दिला.” विराट कोहलीचे हे विधान बऱ्याच दिवसांनी समोर आले आहे.
Fantastic victory for Team India in the 4th Test in Ranchi, securing the Test series against England. Our bowlers capitalized on favorable conditions, with @ashwinravi99 delivering a classy performance, securing a 6-wicket haul in the match. @imjadeja was clinical in the first… pic.twitter.com/7l8Pih9V1K
— Jay Shah (@JayShah) February 26, 2024
अशातच 15 फेब्रुवारीला विराट कोहली दुसऱ्या मुलाचा बाप झाला असून त्याने 20 फेब्रुवारी रोजी त्याने सोशल मीडियावर पोस्ट करून पत्नी अनुष्का शर्माला मुलाला जन्म दिल्याची माहिती शेअर केली होती. त्याने आपल्या मुलाचे नावही सांगितले होते. विराटच्या मुलाचे नाव अकाय आहे. विराट भारतीय संघासोबत नसला तरी तो सर्व काही बारकाईने पाहत होता. त्याचा परिणाम म्हणजे संघाच्या विजयानंतर समोर आलेली त्याची खास पोस्ट सर्व काही सांगून जात आहे.
YES!!! 🇮🇳
Phenomenal series win by our young team. Showed grit, determination and resilience.@BCCI— Virat Kohli (@imVkohli) February 26, 2024
दरम्यान, हैदराबाद कसोटीतील पराभवाने भारतीय संघाने मालिकेची सुरुवात केली होती. त्या सामन्यात भारताने आघाडी घेऊनही सामना गमावला होता. त्यानंतर बरीच टीका झाली होती. पण त्यानंतर रोहितच्या ब्रिगेडने विशाखापट्टणममध्ये जोरदार पुनरागमन केले. तर केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांचाही त्या सामन्यात समावेश नव्हता. त्यानंतर राजकोटमध्येही संघाने तिरंगा फडकावला आणि राहुलशिवाय पुन्हा विजय मिळवला होता. आता रांची कसोटीतही टीम इंडियाने विजय रथ कायम ठेवत मालिकेत विजयाची हॅट्ट्रिक साधत मालिका जिंकली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- IND Vs ENG : रोमहर्षक सामन्यात मालिका भारताच्या खिशात, जाणून घ्या विजयाचे 5 ठळक मुद्दे
- IND Vs ENG : रांची कसोटीत ध्रुव जुरेल ठरला विजयाचा ‘हिरो’, अन् वाढल्या पंत-इशानच्या अडचणी