---Advertisement---

कधी, कुठे आणि कसा पाहायचा IND vs IRE संघातील दुसरा टी20 सामना, पाऊस करणार का खेळ खल्लास? वाचा

IND-vs-IRE
---Advertisement---

तब्बल 11 महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या जसप्रीत बुमराह हा आयर्लंड दौऱ्यावर भारतीय संघाचा कर्णधार आहे. आयर्लंड विरुद्ध भारत संघातील 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला सामना आपल्या नावावर केला. आता या मालिकेतील दुसरा सामना रविवारी (दि. 20 ऑगस्ट) खेळला जाणार आहे. चला तर, दुसऱ्या टी20 सामन्यापूर्वी हवामान आणि मैदानावरील सामन्यांची आकडेवारी पाहूयात…

कसे असेल हवामान?
भारत विरुद्ध आयर्लंड (India vs Ireland) संघातील दुसऱ्या टी20 सामन्यातही पाऊस व्यत्यय आणू शकतो. रिपोर्टनुसार, डब्लिन येथील द विलेज ग्राऊंडवर दुसऱ्या टी20 सामन्यातही पाऊस पडण्याची शक्यता आहे. निराश करणारी बाब अशी की, सामन्याच्या वेळीच पाऊस पडण्याची जास्त शक्यता आहेत. पहिल्या टी20 सामन्यातही पावसाने व्यत्यय आणला होता. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला विजयी घोषित केले गेले होते.

कशी आहे डब्लिनची खेळपट्टी?
आयर्लंड विरुद्ध भारत (Ireland vs India) संघातील दुसरा टी20 सामना डब्लिनच्या द विलेज ग्राऊंड होणार आहे. हे मैदान फलंदाजांसाठी स्वर्ग मानले जाते. तसेच, चेंडूही बॅटवर चांगल्याप्रकारे येतो. म्हणजेच, डब्लिनमध्ये चौकार-षटकारांचा चांगलाच पाऊस पडणार असल्याचे दिसते. मात्र, पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाज आयर्लंडच्या फलंदाजांना रोखण्यात यशस्वी झाले होते.

मैदानावरील सामन्यांची आकडेवारी
डब्लिनच्या या मैदानावर आतापर्यंत 17 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यापैकी 10 सामने धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला आहे. तसेच, 7 सामने मैदानात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. अशात दुसऱ्या टी20 सामन्यातही नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. या मैदानावर धावांचा पाठलाग करणे सोपे असल्याचे म्हटले जाते, याचा पुरावा हे आकडे देत आहेत.

किती वाजता आणि कुठे पाहता येईल सामना?
आयर्लंड विरुद्ध भारत दुसरा टी20 सामना (Ireland vs India 2nd t20 match) भारतीय प्रमाणवेळेनुसार, सायंकाळी 7.30 वाजता सुरू होईल. तसेच, नाणेफेक 7 वाजता होईल. हा सामना स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर लाईव्ह पाहता येईल. तसेच, सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा ऍपवर पाहता येईल. (ind vs ire 2nd t20i match know about weather forecast in dubling ground)

महत्त्वाच्या बातम्या-
“तो सर्वात निस्वार्थी क्रिकेटपटू”, स्टोक्सच्या पुनरागमनावरून भिडले इंग्लंड-ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार
BREAKING: मलिंगा पुन्हा मुंबईकर! आगामी आयपीएलमध्ये बनला मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---