बुधवारी (१५ जून) रात्री बीसीसीआयने आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या मालिकेसाठी हार्दिक पंड्या याला संघाचे कर्णधारपद सोपवले आहे. भारताचा वरिष्ठ संघ इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे निवडकर्त्यांनी या मालिकेसाठी युवा खेळाडूंना निवडले आहे. यामध्ये भारताकडून काही खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहेत.
राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) याची भारतीय संघात निवड झाली आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२च्या हंगामात तो सनरायजर्स हैद्राबादकडून खेळला आहे. त्याने १४ सामन्यात ३७.५४ सरासरीने ४१३ धावा केल्या होत्या. १५८.२४च्या स्ट्राईक रेटने तीन अर्धशतके केली आहेत. या३१ वर्षीय उजव्या हाताच्या फलंदाजाने सहा आयपीएलचे हंगाम खेळले आहेत.
उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग हे सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी२० मालिकेसाठी आधीच भारतीय संघात उपस्थित आहेत. मात्र त्यांना एकही सामन्यात खेळण्याची संधी न मिळाल्याने बाकावर बसून आहेत. या दोघांना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संधी मिळाली नाही, तर त्यांना आयर्लंड दौऱ्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी आहे. उमरानने पंधराव्या आयपीएल हंगामात जलद गतीने गोलंदाजी करत निवडकर्त्यांचे लक्ष वेधले होते.
या मालिकेतून संजू सॅमसन (Sanju Samson) याने भारतीय संघात पुनरागमन केले आहे. त्याने भारतीय संघासाठी १३ टी२० सामने खेळले आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करत संघाला १४ वर्षानंतर अंतिम सामन्यात पोहचवले होते. सुर्यकुमार यादवही दुखापतीमधून ठीक होऊन भारतीय संघात परतत आहे. त्याने मुंबई इंडियन्सकडून उत्तम कामगिरी केली आहे.
या दौऱ्यात भारतीय संघ २ टी२० सामने खेळणार आहेत. यातील पहिला सामना २६ जून आणि दुसरा सामना २८ जूनला खेळला जाणार आहे.
आयर्लंड दौऱ्यासाठीचा भारतीय संघ खालीलप्रमाणे;
हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, राहूल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आर. बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलच्या कामगिरीची दखल की भविष्यातील तजवीज? वाचा हार्दिकच्या हाती नेतृत्वाची धूरा देण्याची ५ कारणे
आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात ३ यष्टीरक्षकांची निवड, पण प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण बनवणार जागा?
इंग्लंड दौऱ्यासाठी ‘या’ महत्त्वाच्या खेळाडूच्या उपस्थितीवरच प्रश्नचिन्ह, दुखापत ठरलीय कारण