भारतीय संघाने न्यूझीलंडला 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत धूळ चारत क्लीन स्वीप दिला होता. आता उभय संघात 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. यातील पहिला सामना शुक्रवारी (दि. 27 जानेवारी) रांची येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाचा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर याने चपळाई दाखवत स्वत:च्याच चेंडूवर न्यूझीलंडच्या दमदार फलंदाजाला तंबूत धाडलं. आता त्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडकडून फिन ऍलेन आणि डेवॉन कॉनवे सलामीला उतरले होते. न्यूझीलंडची पहिली विकेट 43 धावांवर ऍलेन (35) याच्या रूपात पडली. त्यानंतर तिसऱ्या स्थानी मार्क चॅपमॅन फलंदाजीला उतरला. मात्र, त्याला यावेळी भोपळाही फोडता आला नाही.
वॉशिंग्टन सुंदर याने घेतला अद्भुद झेल
झाले असे की, वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) संघाकडून पाचवे षटक टाकण्यासाठी आला होता. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सुंदरने ऍलेनला सूर्यकुमार यादव याच्याकडून झेलबाद केले. त्यानंतर याच षटकाच्या सहाव्या चेंडूवर त्याने चॅपमॅन याचा अद्भूत झेल पकडत तंबूत धाडले. फलंदाजाने यावेळी चेंडूवर बचावात्मक फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटला लागून हवेत गेला. चेंडू आपल्याच बाजूला जाताना पाहून सुंदरने तो चपळाई दाखवत एका हाताने अशक्य झेल शक्य करून दाखवला. यावेळी चॅपमॅन 4 चेंडू खेळू शून्य धावेवर तंबूत परतला.
यादरम्यानचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे. तसेच, कॅप्शन देत “काय कमाल झेल आहे” असे म्हटले आहे.
WHAT. A. CATCH 🔥🔥@Sundarwashi5 dives to his right and takes a stunning catch off his own bowling 😎#TeamIndia | #INDvNZ
Live – https://t.co/9Nlw3mU634 #INDvNZ @mastercardindia pic.twitter.com/8BBdFWtuEu
— BCCI (@BCCI) January 27, 2023
Amazing fielding from Washington Sundar, took one the best catch in cricket.#IndvsNZ #NZvIND #INDVsNZT20 #sundar #wahs pic.twitter.com/ivTRHfX9r9
— Priyanshu Kumar (@priyanshusports) January 27, 2023
https://twitter.com/ayyushaikh9/status/1618973761960816640?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1618973761960816640%7Ctwgr%5Ed85140b027a05dbc53bd0ffbb3b12c51f3814c8f%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news24online.com%2Fsports%2Fcricket%2Find-vs-nz-washington-sundar-excellent-catch-mark-chapman-out-caught-and-bowled-watch-video-brmp%2F139153%2F
न्यूझीलंडचा डाव
न्यूझीलंड संघाने यावेळी प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 176 धावांचा डोंगर उभा केला. या धावा करताना त्यांच्याकडून डॅरिल मिचेल याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 30 चेंडूत 59 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 3 चौकार आणि 5 षटकारांचा पाऊस पाडला. त्याच्याव्यतिरिक्त डेवॉन कॉनवे (52) आणि फिन ऍलेन (35) यांनी मोलाचे योगदान दिले. तसेच, ग्लेन फिलिप्स 17 धावांवर बाद झाला. याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला 2 आकडी धावसंख्या पार करता आली नाही.
यावेळी भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना वॉशिंग्टन सुंदर याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 4 षटके गोलंदाजी करताना 22 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि शिवम मावी यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
भारतीय संघाला 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत विजयी आघाडी घ्यायची असेल, तर या सामन्यात विजय मिळवावा लागेल. (ind vs nz 1st t20 washington sundar excellent catch mark chapman out caught and bowled video viral)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे’सारखीच आहे ‘या’ भारतीय वेगवान गोलंदाजाची लव्हस्टोरी, प्रेमासाठी थेट…
मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! घातक इंग्लिश गोलंदाजाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन