आज (29 जानेवारी) हॅमिल्टन येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना पार पडणार आहे. या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी 11 जणांच्या भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे दुसऱ्या टी20 सामन्यात खेळलेला संघच आजच्या सामन्यात खेळताना दिसणार आहे. तसेच आजही केएल राहुलच यष्टीरक्षणाची सांभाळताना दिसेल.
तसेच न्यूझीलंडने या सामन्यासाठी 11 जणांच्या संघात एक बदल केला आहे. त्यांनी ब्लेएर टिकनर ऐवजी स्कॉट कुगलेइझनला संधी दिली आहे. स्कॉट हा अष्टपैलू खेळाडू असल्याने त्याला या सामन्यासाठी संधी देण्यात आली आहे.
या टी20 मालिकेतील पहिले 2 सामने भारताने जिंकले असून मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतीय संघ आजचा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. तर न्यूझीलंडचा संघ आजचा सामना जिंकून मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी प्रयत्न करेल.
असे आहेत 11 जणांचे संघ –
भारत – रोहित शर्मा, केएल राहुल (यष्टीरक्षक), विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह
न्यूझीलंड – मार्टिन गप्टिल, कॉलिन मुन्रो, केन विलियम्सन (कर्णधार), कॉलिन डी ग्रँडहोम, रॉस टेलर, टिम सिफर्ट (यष्टीरक्षक), मिशेल सॅंटनर, टिम साउथी, स्कॉट कुगलेइझन, ईश सोढी, हमीश बेनेट
असा झाला पाँटिंगचा 'पंटर', जाणून घ्या कारण
वाचा👉https://t.co/MQqfvnLNyZ👈#म #मराठी #Cricket @RickyPonting— Maha Sports (@Maha_Sports) January 28, 2020
…आणि टीम इंडियाविरुद्ध एकही चेंडू खेळण्याआधीच तो फलंदाज झाला बाद
वाचा👉https://t.co/QjiDgPljcP👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #U19CWC— Maha Sports (@Maha_Sports) January 28, 2020