भारतीय संघाविरुद्ध आतापर्यंत खेळलेल्या प्रत्येक सामन्यात आपल्या गोलंदाजीने धुमाकूळ घालणारा न्यूझीलंडचा गोलंदाज काईल जेमिसन येत्या कसोटी मालिकेत वेगळ्या प्रकारच्या भारतीय आव्हानासाठी सज्ज झाला आहे. परदेशी भूमीवर तिसरी कसोटी खेळण्याच्या तयारीत असलेला न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमिसनला चांगली जाणीव आहे की, भारतात कसोटी क्रिकेट खेळण्याचे आव्हान मायदेशात खेळण्यापेक्षा बरेच वेगळे असेल.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना गुरुवारपासून (२५ नोव्हेंबर) कानपूर येथे सुरू होणार आहे. जेमिसनने कसोटी क्रिकेटमध्ये चांगली सुरुवात केली आहे आणि फक्त ८ कसोटी सामन्यांमध्ये त्याच्या नावावर ४६ विकेट्स आहेत. तो यंदा प्रथमच राष्ट्रीय संघासोबत भारतीय दौऱ्यावर आला आहे.
या दौऱ्यावरील आपला पहिलावहिला सामना खेळण्यापूर्वी जेमीसनने ‘स्टफ डॉट को एन झेड’ला सांगितले की, “मी येथे फारसे क्रिकेट खेळलो नाही. मी आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) च्या पहिल्या टप्प्यात भाग घेतला, जो चांगला राहिला. परंतु तो पूर्णपणे वेगळा होता. वॅग्ज (नील वॅगनर) आणि टिमी (टिम साऊदी) माझ्यासोबत आहेत. त्यामुळे त्यांचे मत जाणून घेणे चांगले होईल. त्यांचा भारतातील गोलंदाजीचा अनुभव जाणून घेणे चांगले होईल.”
“घरच्या अर्थातच न्यझीलंडच्या मैदानांवरील गोलंदाजीच्या तुलनेत हे नक्कीच एक पूर्णपणे वेगळे आव्हान असणार आहे. परंतु मी खरोखर त्याची वाट पाहत आहे,” असेही जेमीसन म्हणाला.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासह भारताविरुद्धचे मागील तीन कसोटी सामने जिंकण्यात जेमिसनचा मोलाचा वाटा होता. परंतु आता साऊथी आणि वॅगनरच्या उपस्थितीत कानपूर कसोटीत त्याला न्यूझीलंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता फार कमी दिसते आहे. अशात जेमिसन संघात स्थान मिळवण्यात यशस्वी झाल्यास तो भारताविरुद्धचे आव्हान कशाप्रकारे पूर्ण करेल, हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
“असच सुरू राहिलं, तर १५ वर्षे शोधलं, तरी ऑस्ट्रेलियाला कर्णधार मिळणार नाही”
अखेर प्रतिक्षा संपली! कानपूर कसोटीत श्रेयस करणार पदार्पण; कर्णधार रहाणेने केली घोषणा
वनडे कारकिर्दीत सर्वाधिक धावा देणारे ३ भारतीय गोलंदाज