---Advertisement---

लढवय्या साहावर नेटकरी खूश! चाहत्यांच्या आल्या ‘अशा’ प्रतिक्रिया

On: सोमवार, नोव्हेंबर 29, 2021 2:44 AM
wriddhiman-saha
---Advertisement---

कानपूर कसोटी सामना भारतीय संघासाठी चढ-उताराचा ठरला आहे. चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाची स्थिती बिघडली होती. मात्र, श्रेयस अय्यर आणि वृद्धीमान साहा यांनी भारतीय संघाचा डाव सावरला. ५१ धावांवर पाचवी विकेट आणि १०३ धावांवर सहावी विकेट पडल्यानंतर साहाने खेळपट्टीवर टिकून फलंदाजी केली. मानेला दुखापत असूनही साहाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले, आणि खराब चेंडू सीमारेषेबाहेर पाठवले. त्याने भारताचा डाव २०० च्या पुढे नेला आणि स्वतः ६१ धावांवर नाबाद राहिला. भारतीय संघाने ७ गडी गमावून २३४ धावा केल्यानंतर आपला डाव घोषित केला. दिवसाचा खेळ संपेपर्यंत अश्विनने न्यूझीलंड संघाची एक विकेट घेतली. साहाच्या या जबरदस्त कामगिरीबद्दल ट्विटरवर खूप साऱ्या प्रतिक्रिया आल्या आहेत.

साहाच्या अद्भुत खेळीनंतर, नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. एका चाहत्याने व्हीव्हीएस लक्ष्मणचे ट्विट रिट्विट करत लिहिले की, ‘साहाला संघातून वगळण्याचा ट्रेंड सुरू होता पण आज त्याने आपल्या बॅटने प्रत्युत्तर दिले आहे.’ दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, ‘साहाकडून उत्कृष्ट खेळी. ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरावी.’ अजून एका क्रिकेट चाहत्याने लिहिले की, साहाला सलाम, तो लढवय्या आहे, तो संपला असे अनेकांनी म्हटले होते. पण त्याने आज दाखवून दिले की तो कोणत्या दर्जाचा खेळाडू आहे.’ एका चाहत्याने साहा ज्याप्रमाणे बुद्धीचा वापर करून खेळला ते त्यावर ट्विट करत त्याने म्हटले की, ‘अव्वल खेळी, बुद्धिमान साहा.’

साहाने चार वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावले. कानपूर कसोटी सामन्यापूर्वी, त्याने २०१७ मध्ये कोलंबो येथे श्रीलंकेविरुद्ध शेवटचे कसोटी अर्धशतक केले होते. साहाच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने भारतासाठी ३९ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात त्याने ३ शतकांसह २९.८४ च्या सरासरीने १३१३ धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये साहाची सर्वोत्तम धावसंख्या ११७ धावा आहे, तर त्याने यष्टीमागे ९२ झेल घेतले आहेत आणि ११ फलंदाजांना यष्टीचीत केले आहे. साहाने २०१० मध्ये नागपुर येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---