नुकत्याच झालेल्या महिला टी20 विश्वचषकात निराशाजनक कामगिरी करणारी भारतीय टीम आता पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये दिसणार आहे. भारतीय संघ घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे, ज्याची सुरुवात आज (24 ऑक्टोबर) झाली. मालिकेतील सर्व सामने अहमदाबादमध्ये खेळले जाणार आहेत. पहिल्या सामन्यात टीम इंडियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र या सामन्यात नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर खेळत नाहीये. तिच्या अनुपस्थितीत स्टार फलंदाज स्मृती मंधानाकडे भारतीय संघाचं नेतृत्व आहे.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर जेव्हा टॉससाठी स्मृती मंधाना आली, तेव्हाच संकेत मिळाले होते की, हरमन या सामन्यात खेळणार नाही. तिचं नाणेफेकीला न येण्याचं दुसरं काहीच कारण नव्हतं. काही वेळानंतर बीसीसीआयनं आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती दिली की, हरमनप्रीत कौरला निगल आहे. त्यामुळे तिला आराम देण्यात आलाय. तिच्या अनुपस्थितीत स्मृती मंधाना भारतीय संघाचं नेतृत्व करेल.
हरमनप्रीतचं बाहेर होणं भारतीय संघासाठी मोठा धक्का आहे. ती एक अनुभवी कर्णधारच नाही, तर उत्तम फलंदाज देखील आहे. तिनं युएईमध्ये नुकत्याच खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषकात शानदार फलंदाजी केली होती. स्मृती मंधानाबद्दल बोलायचं झाल्यास, ती प्रथमच एकदिवसीय फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे. न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाच्या प्लेइंग एलेव्हनमध्ये दोन नव्या खेळांडूंची एंट्री झाली. तेजल हसबनीस आणि साइमा ठाकोर यांना पदार्पणाची संधी मिळाली आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी भारताची प्लेइंग 11
स्मृति मंधाना (कर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), दयालन हेमलता, जेमिमा रोड्रिग्स, दीप्ति शर्मा, तेजल हसबनीस, राधा यादव, अरुंधति रेड्डी, साइमा ठाकोर, रेणुका ठाकुर सिंह
हेही वाचा –
SA VS BAN; विजयानंतर दक्षिण आफ्रिकेने WTC मध्ये घेतली मोठी झेप, टीम इंडियाचे टेन्शन वाढले?
रबाडानं जागतिक क्रिकेटमध्ये झेंडा फडकावला! मोर्ने मॉर्केलला मागे टाकत केला मोठा पराक्रम
हा भारतीय खेळाडू बनतोय बळीचा बकरा? प्लेइंग एलेव्हनमधून पुन्हा एकदा विनाकारण वगळलं






