भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात मालिका निर्णायक सामना रविवारी (१८ जानेवारी) इंदौरा येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार शुबमन गिल याने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी भारताच्या अंतिम अकरामध्ये बदल झाला आहे. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याच्या जागी अर्शदीप सिंग याचे संघात पुनरागमन झाले आहे. तसेच न्यूझीलंडच्या संघात एकही बदल झालेला नाही.
जानेवारी ११ पासून सुरू झालेल्या या मालिकेतील पहिला सामना वडोदरा येथे खेळला गेला. हा सामना भारताने जिंकत मालिकेती उत्तम सुरूवात केली होती. राजकोट येथे झालेला दुसरा सामना पाहुण्या संघाने जिंकत मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. यामुळे दोन्ही संघासाठी इंदौरमधील विजय आवश्यक आहे.
अर्शदीपने भारताकडून आतापर्यंत १४ वनडे सामने खेळलले आहेत. यामध्ये त्याने २२ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने भारतासाठी शेवटचा सामना डिसेंबर २०२५मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. या मालिकेसाठी त्याल संघात निवडले गेले मात्र पहिल्या दोन्ही सामन्यात बाकावर बसवले गेले होते. यामुळे अनेकांनी संघ व्यवस्थापनेवर नाराजी व्यक्त केली होती. आता त्याची अंतिम अकरामध्ये वर्णी लागली असून त्याच्याकडून पुन्हा एकदा चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
या सामन्यासाठी दोन्ही संघाचे अंतिम अकरा खेळाडू-
भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज
न्यूझीलंड : डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकल्स, विल यंग, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल हे (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), झॅक्री फाउल्क्स, काइल जेमिसन, क्रिस्टियन क्लार्क, जेडन लेनोक्स
इंदौरच्या होळकर स्टेडियमवर होणाऱ्या या तिसऱ्या वनडे सामन्यात भारताचा विजय आधीच निश्चित केला जात आहे. याचे कारण म्हणजे भारताने या मैदानावरील सर्वच्या सर्व सातही वनडे सामने जिंकलेले आहेत.






