काल (8 फेब्रुवारी) इडन पार्क (Eden Park), ऑकलंड (Auckland) येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात द्विपक्षीय वनडे मालिकेतील दुसरा सामना (2nd ODI Match) पार पडला आहे. हा सामना न्यूझीलंड संघाने 22 धावांनी जिंकला असून मालिकेत 2-0ने विजयी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडकडून रॉस टेलर आणि काईल जेमीसनने केलेली 9 व्या विकेटसाठीची 76 धावांची भागीदारी महत्त्वाची ठरली. तसेच त्यांच्या भागीदारीने एक खास विक्रमही केला आहे. एकवेळ न्यूझीलंड संघाची अवस्था 8 बाद 197 धावा अशी असताना या दोघांनी मिळून न्यूझीलंडला 274 धावांच्या समाधानकारक धावसंख्येपर्यंत पोहचवले.
त्याचबरोबर या दोघांनी केलेली 76 धावांची भागीदारी ही ऑकलंडच्या मैदानावरील वनडेमधील 9व्या विकेटसाठीची ही सर्वाेच्च भागीदारी ठरली आहे. या सामन्यात टेलरने 74 चेंडूत नाबाद 73 धावा केल्या. तर, जेमीसनने 24 चेंडूत नाबाद 25 धावा केल्या.
ऑकलंडमध्ये यापूर्वी 1993मध्ये जी. लार्सन (G. Larsen) आणि सी प्रिंगल (C. Pringle) यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 व्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी केली होती. आता टेलर आणि जेमीसनच्या जोडीने हा विक्रम मोडला आहे.
त्याचबरोबर टेलर आणि जेमीसनने केलेली 76 धावांची भागीदारी ही न्यूझीलंडच्या वनडे क्रिकेट इतिहासातील ही 9 व्या विकेटसाठीची तिसरी सर्वोच्च भागीदारी आहे.
यापूर्वी वनडेमध्ये न्यूझीलंड संघाकडून 9 व्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी 2016 मध्ये झाली होती. त्यावेळी मोहाली मैदानावर भारताविरुद्ध मॅट हेन्री आणि जेम्स नीशम या खेळाडूंनी 84 धावांसाठी भागीदारी केली होती. तर 2009मध्ये काईल मिल्स आणि टिम साऊथीने क्राईस्टचर्च येथे भारताविरुद्ध 83 धावांची भागीदारी केली होती.
#वनडेमध्ये ऑकलंडच्या मैदानावर न्यूझीलंडकडून 9व्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी-
76 धावा – काईल जेमीसन आणि रॉस टेलर
54 धावा – जी. लार्सन आणि सी प्रिंगल
21 धावा – नॅथन ऍसले आणि जी. लार्सन
#वनडेमध्ये न्यूझीलंडकडून 9व्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी –
84 धावा – मॅट हेन्री आणि जेम्स निशम
83 धावा – काईल मिल्स आणि टिम साऊथी
76 धावा – काईल जेमीसन आणि रॉस टेलर
बुमराहच्या गोलंदाजीची कॉपी करणाऱ्या मुलाच्या 'त्या' व्हिडिओवर चहलने केली ही कमेंट…
वाचा- 👉https://t.co/wlkpsHbq5V👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvsNZ @Jaspritbumrah93— Maha Sports (@Maha_Sports) February 8, 2020
'या' कारणामुळे विराट कोहली भडकला अंपायरवर
वाचा- 👉https://t.co/EAT9bZQEtK👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvsNZ @imVkohli— Maha Sports (@Maha_Sports) February 8, 2020