भारतीय संघाचा जबरदस्त फलंदाज रोहित शर्मा हा कर्णधार म्हणून जबरदस्त कामगिरी करत आहे. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने दमदार प्रदर्शन केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या वनडे मालिकेतही भारताने न्यूझीलंडला व्हाईट वॉश दिला. यातील अखेरचा वनडे सामना भारताने 90 धावांनी पराभूत केले. या सामन्यात भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी शानदार शतक झळकावले. एवढेच नाही, तर रोहितने मैदानात त्याच्या क्षेत्ररक्षणानेही सर्वांचे मन जिंकले. क्षेत्ररक्षणादरम्यान रोहितने घेतलेल्या एका झेलाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 9 विकेट्स गमावत 385 धावा चोपल्या होत्या. या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाचा डाव 41.2 षटकात 295 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे भारताने या सामन्यात 90 धावांनी विजय साकारला.
न्यूझीलंडच्या डावादरम्यान भारताकडून कुलदीप यादव 39वे षटक टाकत होता. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर लॉकी फर्ग्युसन हा फलंदाजी करत होता. त्याने चौथ्या चेंडूवर शॉट मारण्याचा प्रयत्न केला. शॉट असा होता की, तिथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या रोहित शर्मा याच्या डोक्यावरून चेंडू पुढे निघून गेला असता. मात्र, रोहितने उलट्या दिशेने धाव घेतली आणि चेंडूवरून नजर न एका हाताने झेल घेतला.
https://twitter.com/saurabhkr89/status/1617973093284327424
What a catch by Rohit Sharma 😍🔥 pic.twitter.com/8faNaxg5uW
— Utsav 💔 (@utsav__45) January 24, 2023
Rohit Sharma the fielder >>>>
One handed stunner catch 🔥🔥 pic.twitter.com/MDYxR029kC— S ∆ U R ∆ B H (@YadavSaurabh_45) January 24, 2023
One handed stunner catch by Captain Rohit Sharma. 🔥 Bodied all the fitness merchants @ImRo45 ❤https://t.co/7ZC820ySo3
— Immy|| 🇮🇳 (@TotallyImro45) January 24, 2023
यादरम्यान रोहितसाठी हा झेल खूपच कठीण वाटत होता. मात्र, त्याने शंभर टक्के योगदान देत हा झेल घेत संघाला विजयाच्या आणखी जवळ नेले. रोहितच्या या विजयासह त्याची फिटनेसही सिद्ध झाली. कारण, रोहितच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
रोहित शर्माने वनडेत झळकावले 30वे शतक
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्मा याने त्याच्या कारकीर्दीतील 30वे वनडे शतक झळकावले. रोहितने यावेळी 85 चेंडूत 101 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 6 षटकार आणि 9 चौकारही मारले. रोहितचे हे शतक तब्बल 3 वर्षांनंतर आले आहे. यासोबतच त्याने रिकी पाँटिंगच्या वनडे शतकांचीही बरोबरी केली आहे. वनडेत रिकी पाँटिंग यानेही 3 शतके झळकावली आहेत. (ind vs nz skipper rohit sharma take amazing catch with one hand against new zealand showed his fitness)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘या’ गोलंदाजामुळे आख्ख्या न्यूझीलंड संघाची मान शरमेनं खाली, भारतीय फलंदाजांनी धू धू धुतलं
विराट अन् गिल नाही, तर कॅप्टन रोहितने ‘या’ खेळाडूला म्हटले टीम इंडियाचा ‘जादूगार’