भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत दमदार कामगिरी करत मालिका खिशात घातली. भारताने पाहुण्या संघाला 3-0ने क्लीन स्वीप दिला. आता भारताला न्यूझीलंडविरुद्ध टी20 मालिका खेळायची आहे. या महत्त्वाच्या मालिकेपूर्वी आता भारतीय संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. सलामीवीर फलंदाज मनगटाच्या दुखापतीमुले न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेतून बाहेर होऊ शकतो.
मंगळवारी (दि. 24 जानेवारी) भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) मालिकेत भारताने शानदार पद्धतीने मालिका नावावर केली. मात्र, त्यानंतर काही तासातच संघाचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) हा दुखापतग्रस्त झाल्याची बातमी समोर आली. मागील वर्षी श्रीलंकेविरुद्ध खेळण्यात आलेल्या वनडे मालिकेपूर्वी ऋतुराज संघाबाहेर गेला होता. विजय हजारे ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर निवडकर्त्यांनी त्याला संघात स्थान दिले होते. मात्र, आता त्याचे न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी टी20 मालिकेत खेळणे कठीण आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्या (Hardik Pandya) करत आहे. तसेच, संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सूर्यकुमार यादव याच्या खांद्यावर आहे. भारतीय संघाकडे सलामीवीर म्हणून सध्या शुबमन गिल, ईशान किशन आणि पृथ्वी शॉ यांसारखे खेळाडू आहेत.
माध्यमांतील वृत्तांनुसार, बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने म्हटले की, “होय, ऋतुराज मनगटाच्या दुखापतीमुळे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहे. आम्हाला अद्याप हे माहिती नाहीये की, त्याची दुखापत किती गंभीर आहे, परंतु सर्वांना माहिती आहे की, मालिकेला आता जास्त कालावधी उरला नाहीये. त्यामुळे तो लवकर फिट होणे कठीण वाटत आहे. त्याला स्कॅनमधून जावे लागणार आहे. तसेच, पुन्हा एकदा जेव्हा अहवाल येईल, तेव्हाच आम्हाला काही कळेल. आमच्याकडे संघात सध्या 4 ते 5 सलामीवीर आहेत. मात्र, हे सर्व निवडकर्त्यांवर अवलंबून आहे की, ते त्याच्या जागी कुणाचे नाव देतात की नाही.”
भारत- न्यूझीलंड टी20 मालिकेचे वेळापत्रक
भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना 27 जानेवारी रोजी रांची येथे खेळला जाणार आहे. त्यानंतर मालिकेतील दुसरा सामना 29 जानेवारी रोजी लखनऊ येथे खेळला जाईल. तसेच, मालिकेतील तिसरा आणि अखेरचा टी20 सामना 1 फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथे खेळला जाईल. (ind vs nz t20 cricketer ruturaj gaikwad wrist injury may rules out reports to reaches nca)
न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ
हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड (एनसीएमध्ये खेळण्याची शक्यता कमी), दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ICC ODI Rankings: शानदार शुबमनसह रोहितही टॉप 10मध्ये, पण विराटला बसला फटका
सिराजच्या शिरपेचात मानाचा तुरा, भल्याभल्यांना पछाडत वनडे रँकिंगमध्ये बनला अव्वल गोलंदाज