भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीच्या तयारीला सुरूवात झाली आहे. हा सामना 1 नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दरम्यान पुढील सामन्यात सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर असणार आहेत. या मालिकेतील एकाही डावात त्याची बॅट अद्याप चाललेली नाही. कोहलीचा तोच जबरदस्त फॉर्म पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ज्यासाठी तो ओळखला जातो. दरम्यान, या सामन्यात कोहली पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरताच तो राहुल द्रविडचा मोठा विक्रम मोडेल. यानंतर त्याच्यापुढे फक्त सचिन तेंडुलकर उरणार आहे.
खरंतर, विराट कोहलीने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 599 डाव खेळले आहेत. म्हणजेच 600 डाव पूर्ण करण्यासाठी त्याला आणखी एका सामन्याची गरज आहे. 1 नोव्हेंबरपासून मुंबईत सुरू होणाऱ्या कसोटीत कोहली मैदानात उतरताच, अशी कामगिरी करणारा तो भारताचा दुसरा फलंदाज ठरेल. रंजक आणि योगायोग म्हणजे राहुल द्रविडनेही त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत केवळ 599 डाव खेळले आहेत. जरी तो त्याची 600 वी इनिंग खेळू शकला नाही. पण दुसऱ्या दृष्टीकोनातून पाहिले तर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 हून अधिक डाव खेळले आहेत.
राहुल द्रविडने एकूण 605 डाव खेळले आहेत. मात्र त्याने भारतासाठी हे केले नाही. द्रविडने आशिया 11 साठी काही सामनेही खेळले आहेत. त्यामुळे त्याच्या एकूण आंतरराष्ट्रीय डाव 600 हून अधिक आहेत. पण तो भारतासाठी केवळ 599 डाव खेळू शकला आहे. म्हणजेच कोहली या बाबतीत राहुल द्रविडचा विक्रम मोडण्याच्या मार्गावर आहे. आता हा विक्रम कसोटीच्या पहिल्याच दिवशी मोडला जाणार की नंतर, हे पाहणे नक्कीच उत्सुकतेचे ठरणार आहे.
सचिन तेंडुलकर हा भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय डाव खेळणारा फलंदाज आहे. त्याने भारतासाठी 782 डाव खेळले आहेत. या बाबतीत तो पहिल्या क्रमांकावर आहे. विराट कोहली राहुल द्रविडला मागे टाकेल यात शंका नाही. मात्र तो सचिन तेंडुलकरला मागे टाकणार का हे पाहणे नक्कीच उत्सुकतेचे ठरणार आहे. दरम्यान, विक्रमासोबतच पुढील सामन्यात कोहलीची बॅट जशी कामगिरी करेल, त्याकडेही सर्वांचे नजरा लागले आहेत.
हेही वाचा-
IND vs AUS: रोहित-विराट नाही तर हा खेळाडू रिकी पाँटिंगचा आवडता
चेन्नई सुपर किंग्जनं जाहीर केली रिटेन होणाऱ्या खेळाडूंची यादी! या 5 जणांना ठेवणार कायम?
“टीम इंडियाला पराभूत करणे हेच अंतिम ध्येय…”, पॅट कमिन्सची खोचक प्रतिक्रिया