भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन याने पाकिस्तानविरुद्ध पहिल्यांदाच वनडे सामन्यात अर्धशतक ठोकले. भारताने शनिवारी(2 सप्टेंबर) आशिया चषक 2023मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून अभियानाची सुरुवात केली. पहिल्याच सामन्यात भारतीय फलंदाजी क्रम ढासळताना दिसला. पण पाचव्या विकेटसाठी हार्दिक पंड्या आणि ईशान किशन यांच्यात मोठी भागीदारी झाली.
ईशान किशन (Ishan Kishan) याने आतापर्यंत 17 वनडे सामने खेळले असून यातला एकही सामना त्याने पाकिस्तानविरुद्ध खेळला नाहीये. वनडे कारकिर्दीतील 18व्या सामन्यात मात्र त्याला कट्टर प्रतिस्पर्धी संघ पाकिस्तानविरुद्ध संधी मिळाली. या सामन्यात त्याने भारतीय संघ अडचणीत असताना 54 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. यात एक षटकार आणि सहा चौकारांचा समावेश होता. (IND vs PAK a well made half-century by ishan kishan 51 off 54 deliveries)
दरम्यान ईशान किशन आणि हार्दिक पंड्याची भागीदारी होण्याआधी भारताने पहिल्याच चार विकेट्स स्वस्तात गमावल्या होत्या. कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल डावाची सुरुवात करण्यासाठी आले. पण दोन्ही सलामीवीर अनुक्रमे 11 आणि 10 धावा करून बाद झाले. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेला विराट कोहली 4, तर चौथ्या क्रमांकावर आलेला श्रेयस अय्यर 14 धावा करून तंबूत परतले.
भारत प्लेईंग इलेव्हन– रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज
पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन- फखर झमान, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), सलमान अली, मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ व नसीम शाह.
महत्वाच्या बातम्या –
वनडे आशिया चषकात 2014 पासून विराटची बॅट शांतच, समोर आले चाहत्यांची चिंता वाढवणारे आकडे
भारताचा सलग तिसरा फलंदाज स्वस्तात बाद! हॅरिस रौफने केली श्रेयस अय्यरची शिकार