आशिया चषक स्पर्धेत रविवारी (30 ऑगस्ट) भारत आणि पाकिस्तान संघ आमने सामने आले होते. भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने या सामन्यात चमकदार कामगिरी केली आणि भारताला विजय मिळवून देण्यासाठी महत्वाची भूमिका देखील पार पाडली. ही पहिलीच वेळ होती, जेव्हा भारतीय संघासाठी एखाद्या टी-20 सामन्यात सर्वच्या सर्व विकेट्स वेगवान गोलंदाजानी घेतल्या असतील. भुवनेश्वरच्या या प्रदर्शनापुढे जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी याचे प्रदर्शन देखील फिके पडले आहे.
आशिया चषकातील या लढतीपूर्वी भारत आणि पाकिस्तान संघ मागच्या वर्षी टी-20 विश्वचषकात आमने सामने आले होते. भारताला त्यावेळी पाकिस्तानकडून 10 विकेट्सने मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. मोहम्मद शमी (Mohammad Shami) याने या सामन्यात 3.5 षटकात 43 धावा खर्च केल्या, तर जयप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने 3 षटकात 22 धावा दिल्या. हे दोघेही पाकिस्तानच्या एखाद्या फलंदाजाला देखील बाद करू शकले नव्हते, ज्याचा परिणाम म्हणून भारताचा दारून पराभव झाला होता.
बुमराह आणि शमी यांनी मागच्या वर्षी केलेल्या या प्रदर्शनाच्या तुलनेत भुवनेश्वर कुमार (Bhuvaneshwar Kumar) भारतीय संघासाठी खूपच चांगली गोलंदाजी करू शकला. त्याने रविवारी पाकिस्तानविरुद्ध चार षटके गोलंदाजी केली आणि 26 धावा खर्च करून 4 महत्वाच्या विकेट्स घेतल्या. या सामन्यात भुवनेश्वरव्यतिरिक्त अर्शदीप सिंग 2 आणि आवेश खान याने 1 विकेट घेतली. राहिलेल्या तीन विकेट्स अष्टपैलू हार्दिक पंड्या याच्या नावापुढे जोडल्या गेल्या.
पाकिस्तानविरुद्ध रविवारी भारतीय संघ मैदानात उतरण्यापूर्वी प्रत्येकजण चर्चा करत होता की, बुमराह आणि शमी नसल्यामुळे भारताला त्याची किंमत मोजावी लागू शकते. परंतु, भुवनेश्वरने या सामन्यात असे प्रदर्शन करून दाखवले, जे या दोघांनाही जमले नाही. तसे पाहिले तर भुवनेश्वरचा शॉर्ट चेंडू फलंदाजांसाठी जास्त चिंतेचा विषय नसतो. कारण त्याचा बाउंसर बुमराह आणि शमीप्रामाणे घातक नसतो. पण यावेळी नेमका हाच चेंंडू टाकून त्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची विकेटे घेतली आणि भारताच्या विजयाचा पाया रचला. त्याचे प्रदर्शनत पाहता भविष्यात देखील बुमहार आणि शमीची संघाला कमतरता जाणवणार नाही, असे चाहत्यांचे मत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
लंकादहनानंतर आता बांग्लादेशला नमवायला अफगाणिस्तान सज्ज! पाहा दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11
उथप्पाला ‘या’ भारतीय खेळाडूत दिसते कॅप्टन कुलची झलक; म्हणाला, ‘भविष्यात…’
शाहीद आफ्रिदीने गंभीरविषयी केलेल्या ‘त्या’ कमेंटवर हसला भज्जी, चाहत्यांनी धरले धारेवर