भारतीय संघाने रविवारी (28 ऑगस्ट) आशिया चषक स्पर्धेतील त्यांच्या अभियानाची सुरुवात केली. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाविरुद्ध भारतालाने या स्पर्धेतील पहिला सामना खेळला. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने या सामन्यान नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानी संघाचा वरच्या फळीतील फलंदाज फखर झमान याने स्वस्तात विकेट गमावली, पण चाहत्यांचे मन मात्र नक्कीच जिंकले.
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज आवेश खान (Avesh Khan) याला पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात प्लेइंग इलेव्हमध्ये संधी दिली गेली. आवेश देखील त्याच्यावर दाखवलेल्या याविश्वासास पात्र ठरला. डावातील 6 व्या षटकात आवेश त्याच्या कोट्यातील पहिले षटक टाकण्यासाठी आला. या षटकातील पाचवा चेंडू आवेशने शॉर्ट टाकला, जो खेळण्याच्या प्रयत्नात फखर झमान (Fakhar Zaman) याने विकेट मागवली. झमानची विकेट गेल्यानंतर पाकिस्तानची धावसंख्या 42 धावांवर दोन विकेट्स अशी होती.
झमान पाकिस्तानसाठी 6 चेंडू खेळला आणि दोन चौकारांच्या मदतीने अवघ्या 10 धावा करून बाद देखील झाला. स्वतःच्या संघासाठी त्याला अपेक्षित धावांचे योगदान जरी देता आले नसले, तरी चाहते आणि क्रिकेटचे जाणकार त्याचे कौतुक करत आहेत. त्याचे झाले असे की, आवेशचा चेंडू जमाच्या बॅटला लागून यष्टीरक्षक दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याच्या हातात गेला होता. परंतु भारतीय संघाला देखील विकेट मिळाल्याची खात्री नव्हती. याच कारणास्तव संघातील खेळाडूंनी विकेटसाठी जोरदार अपील देखील केली नाही. परंतु झमानने खेळाडू वृत्ती दाखवली आणि पंचांचा निर्णय येण्यापूर्वीच खेळपट्टी सोडली. सोशल मीडियावर चाहते याविषयी कौतुक करत आहेत.
Babar Azam ☝️
Fakhar Zaman ☝️Two big wickets for Team India in the moving powerplay 🔥#INDvsPAK #AsiaCup #Cricket pic.twitter.com/OVzh2dBJxx
— Wisden India (@WisdenIndia) August 28, 2022
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), के एल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, आवेश खान
पाकिस्तान – बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर झमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, आसिफ अली, शादाब खान, हरिस रौफ, नसीम शाह, शाहनवाज दहनी, मोहम्मद नवाज
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
हार्दिकच्या बाऊंसरपुढे इफ्तिकारने टेकले गुडघे! कार्तिकच्या जबरदस्त झेलच्या जोरावर भारताला मिळाली तिसरी विकेट
‘हे मी काय पाहतोय’, रिषभ पंतला संघाबाहेर ठेवल्याने भारतीय दिग्गजाला बसला धक्का, म्हणाला…
IND vs PAK | रिषभ पंत महत्वाच्या सामन्याला मुकला! कर्णधार रोहितने दिले स्पष्टीकरण