भारतीय संघाने रविवारी (23 ऑक्टोबर) कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध 4 विकेट्सने विजय मिळवला. विराट कोहली या विजयाचा खऱ्या अर्थाने शिल्पकार ठरला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट्सच्या नुकसानावर 159 धावा केल्या. प्रत्युत्तरा भारतीय संघाने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. विराट या सामन्यात 82 धावा करून शेवटपर्यंत नाबाद राहिला. विराट या खेळीनंतर एका खास यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
विराट कोहली (Virat Kohli) याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात एकूण 53 चेंडू खेळला, ज्यामध्ये 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 82 धावा केल्या. विराटने टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात लक्ष्याचा पाठलाग करताना (जिंकलेल्या सामन्यांमध्ये) भारतासाठी सर्वात मोठी खेळी केली आहे. यापूर्वी देखील या यादीत पहिल्या क्रमांकावर विराटच होता. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद 82 धावांची खेळी केली होती. एवढेच नाही या यादीत पहिल्या चार क्रमांकांवर विराट कोहलीचेच नाव आहे.
भारतीय संघासाठी टी-20 विश्वचषकात लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वात मोठी खेळी करणारे फलंदाज (जिंकलेल्या सामन्यांमध्ये)
82* – विराट कोहली विरुद्ध पाकिस्तान
82* – विराट कोहली विरुद्ध ऑस्ट्रेलिया
78* – विराट कोहली विरुद्ध पाकिस्तान
72* – विराट कोहली विरुद्ध दक्षिण आफ्रिका
62* – रोहित शर्मा विरुद्ध वेस्ट इंडीज
57* – विराट कोहली विरुद्ध बांगलादेश
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर विराटव्यतिरिक्त भारतासाठी अर्शदीप सिंग आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. तत्पूर्वी पाकिस्तानसाठी शान मसूद (52) आणि इफ्तिखार अहमद (51) यांनी अर्धशतके केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
एक हजारी हार्दिक पंड्या! आंतरराष्ट्रीय टी20मध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय
पाकिस्तानविरुद्धचा विजय टीम इंडियासाठी खासच, लाखो भारतीयांपुढे विराटला मैदानातच अश्रू अनावर