दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा टी२० रविवारी (१२ जून) सामना बाराबती स्टेडियम, कटक येथे खेळला जाणार आहे. या मालिकेत दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यांनी संघात पुनरागमन केले आहे. आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) २०२२मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळताना कार्तिकने अनेक सामन्यात फिनिशरची भुमिका पार पाडली होती. त्याचे भारतीय संघात आत-बाहेर येण्याचे सत्र सुरूच आहे.
कार्तिकने तीन वर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन केले आहे. त्याला २०१९च्या वनडे विश्वचषकानंतर भारताकडून एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. आयपीएलच्या कामगिरीमुळे त्याने भारतीय संघात जागा निर्माण केली आहे.
दिल्ली येथे झालेल्या सामन्यात कार्तिकने दोनच चेंडू खेळले होते. यामध्ये अंतिम अकरामध्ये त्याला घ्यावे की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. मात्र, लखनऊ सुपर जायंट्सचे मेंटर गौतम गंभीर (Gautam Gambhir) याचा कार्तिकला भारतीय संघात संधी देण्याबाबत वेगळेच मत आहे.
आयपीएल २०२२च्या हंगामात लखनऊकडून खेळणाऱ्या दीपक हुड्डाने उत्तम फलंदाजी केली आहे. त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत संघात घेतले आहे. “कार्तिकला पहिल्या सामन्यात खेळवले आहे, त्याला पुढेही संधी मिळेल. दीपकचा आयपीएलमधील फॉर्म पाहता त्याला संधी देता येईल. मात्र, पुढील सामन्यात कोणत्याही बदलाची आवश्यकता नाही,” असे गंभीर म्हणाला आहे.
दीपकबरोबरच रवि बिश्नोई या लखनऊच्या संघातील खेळाडूची अंतिम अकरामध्ये निवड व्हावी असे मत गंभीरने मांडले आहे. “फिरकीपटूला पूरक अशी कटकची खेळपट्टी असून एका वेगवान गोलंदाजाला बाहेर करत फिरकीपटूचा समावेश करावा. मैदान छोटे असल्याने अधिक स्पिन मिळणार नाही. यासाठी पहिल्या सामन्यातील संघ कायम ठेवता येईल,” असेही गंभीरने पुढे म्हटले आहे.
कार्तिकने बेंगलोरकडून पंधराव्या आयपीएल हंगामात खेळताना १६ सामन्यात १८३.३३ स्ट्राईक रेटने ३३० धावा केल्या होत्या. यावेळी तो पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येत होता. तर दीपक तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत होता. त्याने १५ सामन्यात १३६च्या स्ट्राईक रेटने ४५१ धावा केल्या होत्या.
भारतीय संघ पहिल्या सामन्यात पराभव झाल्याने दुसऱ्या सामना जिंकून मालिकेत परतण्याचा ,तर दक्षिण आफ्रिका त्यांची विजयाची मालिका सुरू ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दिनेश कार्तिक नव्हे तर ‘हा’ खेळाडू ठरेल भारतीय संघासाठी सर्वात मोठा गेमचेंजर, माजी कर्णधाराचा दावा