भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात रविवारी (१२ जून) दुसरा टी२० सामना खेळला जाणार आहे. बाराबती स्टेडियम, कटक येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्याला सायंकाळी ७ वाजता सुरुवात होणार आहे. पहिल्या सामन्यात ७ विकेट्स ने पराभव झाल्याने यजमान संघ पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत १-०ने मागे आहेत.
दुसऱ्या सामन्यात चांगली कामगिरी करून मालिकेत परत येण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. या सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने काही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
भुवनेश्वर म्हणाला, “मागील सामन्यात आमची गोलंदाजी वाईट झाली. या सामन्यात गोलंदाजीत उत्तम कामगिरी करण्यावर आमचा जोर असणार आहे. फलंदाजीत सातत्य कायम राखणे याला पण महत्व असणार आहे.”
“या सामन्यात जे गोलंदाज आहेत ते आयपीएलमध्ये (इंडियन प्रीमियर लीग, २०२२) खेळले आहेत. मला पॉवरप्लेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करावी लागेल जेणेकरून फलंदाजांना अधिक धावा करता येणार नाही. एक वरिष्ठ गोलंदाज म्हणून माझी जबाबदारी आहे की, युवा खेळाडूंना सहकार्य करण्याचे ती मी पूर्ण करणारच आहे,” असेही भुवनेश्वर पुढे म्हणाला आहे.
भारतीय संघ रिषभ पंत (Rishabh Pant) याच्या नेतृत्वाखाली खेळत असून दक्षिण आफ्रिकेची मागील सामन्यातील कामगिरी पाहता दुसरा सामना जिंकणे कठीण वाटत आहे. हे अशक्य नाही असे मत भुवनेश्वरने (Bhuvneshwar Kumar) व्यक्त केले आहे.
“संघ सामन्यात पराभूत झाला याला कारणीभूत फक्त कर्णधारच नसतो. प्रत्येक सामना जिंकणे अशक्य आहे, मात्र त्यामध्ये गोलंदाजी आणि फलंदाजी विभागात चांगले खेळून संघाला मालिका जिंकून देण्याचे आमचे लक्ष्य आहे,” असे भुवनेश्वर पुढे म्हणाला आहे.
“कटकचे मैदान छोटे असून आम्हाला विशेष रणनीतीनुसार खेळावे लागेल. मैदान छोटे असले म्हणून काय झाले आयपीएलमध्ये अशा छोट्या मैदानावर खेळण्याचा अनुभव आहे,” असे म्हणत भुवनेश्वरने मैदानबाबतही माहिती सांगितली आहे.
कटक या मैदानावर भारतीय संघ तिसराच टी२० सामना खेळणार आहे. यामध्ये भारत एक सामना जिंकला आणि एक सामन्यात पराभूत झाला होता. यातील २०१५मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना ९२ धावांवर सर्वबाद झाला होता. हा सामना दक्षिण आफ्रिकेने ६ विकेट्सने जिंकला होता.
दिल्लीच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चांगलाच मार खाल्ला होता. तर फलंदाजीमध्ये सलामीवीर इशान किशनने ७६ धावांंची खेळी केली होती. हार्दिक पंड्याने फलंदाजी बरोबरच गोलंदाजी करत एक षटक टाकले होते.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कटकमध्ये भारत-दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू चाखणार ‘या’ पदार्थांची चव, पाहा मेन्यू
आशिष नेहराने जेव्हा संघ सहकाऱ्याला दिला होता आपला ‘सामनावीर’ पुरस्कार, वाचा असे प्रसंग
कसोटी पदार्पणावेळी वडील होते इंग्लंडचे प्रशिक्षक, आता त्याच संघाविरुद्ध ठोकली सलग २ शतके