भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जात असलेल्या 4 सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना आज (15 नोव्हेंबर) जोहान्सबर्ग येथे खेळला जाणार आहे. भारतानं मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात 11 धावांनी विजय मिळवला होता. सूर्या ब्रिगेडची नजर आज मालिका जिंकण्याकडे असेल, तर यजमान दक्षिण आफ्रिका मालिका बरोबरीत आणण्याचा प्रयत्न करेल. या सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह उतरू शकतात, हे आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे सांगतो.
यष्टिरक्षक संजू सॅमसननं मालिकेतील पहिल्याच सामन्यात सलामीवीर म्हणून झंझावाती शतक झळकावलं. मात्र, पुढील दोन सामन्यांत त्याची बॅट शांतच राहिली. तो दोन्ही सामन्यात शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला. सॅमसन चौथ्या टी20 मधून बाहेर होण्याची शक्यता फारशी नाही, कारण कर्णधार सूर्यानं त्याला सतत संधी देण्याचं आश्वासन दिलं होतं.
भारतासाठी स्फोटक फलंदाज रिंकू सिंहचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. तो गेल्या काही महिन्यांपासून चांगला खेळ करू शकलेला नाही. अशा परिस्थितीत चौथ्या सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल अपेक्षित नाही. सेंच्युरियनमध्ये रमणदीप सिंगला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्यानं या सामन्यात बॅटनं आपली उपयुक्तता सिद्ध केली.
या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होऊ शकतात. वेगवान गोलंदाज जेराल्ड कोएत्झीच्या जागी यजमान संघ लेगस्पिनर नाकाबायोमजी पीटरला संधी देऊ शकतो. कोएत्झीनं चालू मालिकेत तीन सामन्यांत चार विकेट घेतल्या आहेत. तिसऱ्या सामन्यात त्यानं 51 धावा दिल्या आणि त्याला एकही बळी मिळाला नाही.
दक्षिण आफ्रिकेला कर्णधार एडन मार्करमकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे, तो मालिकेत आतापर्यंत केवळ 40 धावाच करू शकला आहे. सेंच्युरियनमध्ये त्यानं 29 धावांची इनिंग खेळली होती.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन – संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंह, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती
दक्षिण आफ्रिकेची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, एडन मार्करम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, मार्को जेन्सेन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी/एनकाबायोमजी पीटर, केशव महाराज, लुथो सिपामला
हेही वाचा –
हे तीन खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्माचे उत्तराधिकारी, माजी क्रिकेटपटूचा विश्वास
इतिहास घडला! मुंबई इंडियन्सच्या वेगवान गोलंदाजानं एका डावात सर्व 10 विकेट घेतल्या!
IND vs AUS: विराट कोहलीचा फ्लॉप शो सुरूच, सराव सामन्यातही धावा निघेना!