दक्षिण आफ्रिकेचा कसोटी कर्णधार टेम्बा बावुमा याला बॉक्सिंग डे कसोटीदरम्यान दुखापत झाल्याचे समोर आले होते. आता त्याच्या फिटनेसबाबत महत्वाची बातमी समोर येत आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिक यांच्यातील कसोटी मालिकेचा हा पहिलाच सामना असून सेंच्युरियनमध्ये ही लढत सुरू आहे. पहिल्या दिवशी भारतीय संघावर यजमान दक्षिण आफ्रिका भारी पडल्याचे दिसते.
बॉक्सिंग डे कसोटीत भारतीय संघाने नाणेफेक गमावल्यामुळे त्यांना प्रथम फलंदाजी करावी लागली. भारताच्या पहिल्या डावातील 20व्या षटकात मार्को यान्सेन गोलंदाजी करत होता. याच षटकात विराट कोहील (Virat Kohli) याने एका चेंडूव्ह कव्हर ड्राईव्ह मारला. हा चेंडू रोखण्यासाठीच दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा (Temba Bavuma) धावाला. पण चौकार रोखण्याच्या प्रयत्नात बावुमचे हॅमट्रिंग दुखावल्याचे समोर येत आहे. दुखापतीनंतर कर्णधाराला दक्षिण आफ्रिकेच्या फिजिओंनी मैदानाबाहेर नेले.
बावुमाच्या फिटनेसबाबत अशी माहिती समोर येत आहे की, बॉक्सिंग डे कसोटीत बावुमा पुढे खेळेल कुठलीच खात्री देता येणार नाही. क्रिकेट दक्षिण आफ्रिकाच्या माहितीनुसार, “स्कॅनमध्ये असे समोर आले आहे की, बावुमाचे डावे हॅमस्ट्रिंग दुखावले गेले आहे. सामन्यात खेळेण्यासाठी त्याला मिडिलक टीमच्या निर्शणाखालून जावे लागेल. त्यानंतर अंतिम निर्णय घेता येईल.”
Temba Bavuma is going off the field. pic.twitter.com/wvNc5uLFYm
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 26, 2023
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारतासाठी सुरुवात अपेक्षित पद्धतीने झाली नाही. चहापाणाच्या ब्रेकपर्यंत भारताने 50 षटकांमध्ये 7 विकेट्स गमावल्या आणि संघाची धावसंख्या 176 होती. कागिसो रबाडा याने विकेट्सचे पंचक नावावर केले. भारतासाठी एकट्या केएल राहुल (KL Rahul) याने अर्धशतक केले. (IND vs SA Boxing Day test ; Important information on Temba Bavuma’s injury)
पहिल्या कसोटीसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन-
दक्षिण आफ्रिका संघ-
डीन एल्गर, एडेन मार्करम, टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काईल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को यान्सेन, गेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर.
भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
महत्वाच्या बातम्या –
Boxing Day Test । रोहितवर विराट पडला भारी! ‘या’ बाबतीत ठरला सर्वात उजवा
IND vs SA: मोहम्मद शमी दक्षिण आफ्रिका कसोटीत न खेळण्याने दिग्गज क्रिकेटपटू नाराज; म्हणाला, ‘ही अत्यंत लाजिरवाणी…’