भारतीय संघ घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (INDvsSA) तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेनंतर तीन सामन्यांची वनडे मालिकाही खेळली जाणार आहे. वनडे मालिकेत भारताचे नेतृत्व शिखर धवन करणार आहे. यावेळी भारताच्या वनडे संघात अनेक बदल दिसणार आहेत. शुबमन गिल आणि संजू सॅमसन यांची संघात जागा पक्की आहे. तर मध्ये प्रदेशचा युवा फलंदाज रजत पाटीदार आयपीएल आणि स्थानिक क्रिकेटनंतर आता त्याला भारताच्या वनडे संघात घेतले जाण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, रजतच्या सध्याच्या फॉर्मकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यामुळे तो वनडे संघासाठी प्रबळ दावेदार आहे. त्यातच श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) हा पण भारताच्या मुख्य संघासोबत ऑस्ट्रेलियाला राखीव खेळाडू म्हणून जाणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये 16 ऑक्टोबरपासून टी20 विश्वचषक खेळला जाणार आहे. त्यामुळे भारतीय संघ काही दिवसांआधीच ऑस्ट्रेलियात पोहोचणार असून सराव सामने खेळणार आहे. यादरम्यानच हनुमा विहारी इराणी चषकामध्ये खेळणार आहे. यामध्ये तो शेष भारत संघाचे नेतृत्व करणार आहे. अशी स्थिती असल्याने रजतची भारताच्या वनडे संघात वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका 6, 9 आणि 11 ऑक्टोबरला खेळली जाणार आहे. रजत पाटीदार (Rajat Patidar) याची स्थानिक स्पर्धांमधील कामगिरी पाहिली तर त्याने नुकत्याच न्यूझीलंड ए संघाविरुद्ध कसोटी मालिकेत दोन शतके केली. पहिल्या कसोटीमध्ये त्याने 176 आणि तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या जावात नाबाद 109 धावा केल्या.
पाटीदारने 45 प्रथम श्रेणीच्या सामन्यात 45.49च्या सरासरीने 3230 धावा केल्या. यामध्ये त्याने 10 शतके आणि 16 अर्धशतके केली आहेत. तर त्याचा 196 हा वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्या आहे. तसेच त्याने लिस्ट ए च्या 45 सामन्यात 3 शतके करताना 1462 धावा केल्या. तसेच 39 टी20 सामन्यात एक शतक झळकावत 1194 धावा केल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सेहवाग, गेल, डिविलियर्स या दिग्गजांमध्येही आपले वेगळेपण जपणारा मॅक्यूलम
मुंबईने टीम इंडियाला दिलेला ‘हा’ अवलिया फलंदाज, ज्याने तब्बल ५ रणजी संघाचं केलं होतं प्रतिनिधित्व