---Advertisement---

पहिले कसोटी शतक, पहिला विजय अन् बरचं काही; द. आफ्रिकेशी जोडलेल्या आहेत द्रविडच्या खूप आठवणी

On: रविवार, डिसेंबर 26, 2021 12:16 PM
coach-dravid
---Advertisement---

राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्यासाठी दक्षिण आफ्रिका दौरा (India Tour Of South Africa) हा भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून पहिलाच परदेशी दौरा असणार आहे. २६ डिसेंबर रोजी बॉक्सिंग डे कसोटी (Boxing Day Test) सामन्याने या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी द्रविड यांनी दक्षिण आफ्रिका संघ आणि येथील परिस्थितींवर (Dravid On South Africa Condition) प्रतिक्रिया दिली आहे. दक्षिण आफ्रिकेतील मैदाने त्यांच्यासाठी भाग्यशाली राहिली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे, येथेच त्यांनी भारतीय संघाच्या कर्णधाराच्या रुपात पहिला कसोटी सामनाही जिंकला होता. 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोशल मीडियावर द्रविड यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये द्रविड सांगतात की, “आम्ही एका चांगल्या देशाच्या दौऱ्यावर आलो आहोत. येथे खेळणे खूप आव्हानात्मक आहे, सोबतच तितकेच रोमांचकदेखील. माझ्या दक्षिण आफ्रिकेशी खूप चांगल्या आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत. मी येथेच माझे पहिले कसोटी शतक (First Test Century) केले होते आणि कर्णधाराच्या रुपात पहिला कसोटी विजयही (First Test Win) येथेच मिळवला होता. याव्यतिरिक्त येथे झालेल्या २००३ विश्वचषकातही आम्ही अंतिम सामन्यापर्यंत पोहोचलो होतो. पण आम्ही येथे काही सामने गमावलेही आहेत.”

हेही वाचा- ‘सिनीयर खेळाडूंना वगळले गेले, तरच त्यांना आपल्या स्थानाचे महत्त्व कळते’, द्रविड यांची रहाणेवर मोठी प्रतिक्रिया

“ही एक अशी जागा आहे, जिथे क्रिकेटपटूंना क्रिकेट खेळायला खूप आवडते. येथे मी खूप सारे मित्रही बनवले आहेत. पण सध्या जैव सुरक्षित वातावरणाचे बंधन असल्याने मी त्यांना भेटू शकलो नाही. मी दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या कसोटी आणि वनडे मालिकांसाठी खूप उत्सुक आहे,” असेही त्यांनी म्हटले.

पुढे बोलताना द्रविड म्हणाले की, भारतीय कसोटी संघाच्या मागील काही वर्षांतील प्रदर्शनाला पाहता, त्यांच्याकडून परदेशी दौऱ्यांवरील अपेक्षा अजूनच जास्त वाढल्या आहेत. द्रविड म्हणाले की, “वास्तवात गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाकडूनच्या अपेक्षा वाढल्या आहेत. कारण जेव्हाही भारतीय संघ परदेशी दौऱ्यावर जातो, तेव्हा ते कोणत्याही स्वरुपात विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतील.”

मात्र भारताला अद्याप दक्षिण आफ्रिकेत दक्षिण आफ्रिकाविरुद्ध एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. अशात द्रविड यांच्या वक्तव्यानुसार, भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकत इतिहास रचतो की नाही हे पाहावे लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘सिनीयर खेळाडूंना वगळले गेले, तरच त्यांना आपल्या स्थानाचे महत्त्व कळते’, द्रविड यांची रहाणेवर मोठी प्रतिक्रिया

एकीचे बळ! जेव्हा हरभजनवर आलेली बंदी, तेव्हा भारतीय संघाने दाखवलेला खंबीर पाठींबा, वाचा तो किस्सा

कमिन्सने हमीदला बाद करताच क्रिकेटचे जन्मदाते इंग्लंडच्या नावावर ‘तो’ नकोसा विक्रम, तेही एकदा नव्हे दोनदा

हेही पाहा- 

बॉक्सिंग डेचा अर्थ, त्याचा इतिहास आणि बरचं काही... | What is Boxing Day Test? History of Boxing Day

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---