श्रीलंकेचा संघ सध्या भारत दौऱ्यावर (Sri Lanka Tour Of India) आला असून उभय संघांमध्ये ३ सामन्यांची टी२० मालिका (3 Matches T20 Series) सुरू आहे. नुकताच लखनऊच्या एकाना स्टेडियमवर भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात पहिला टी२० सामना झाला. भारतीय संघाने या सामन्यात एकतर्फी विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यातील कर्णधार रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) याच्या नेतृत्त्व कामगिरीने श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू रसेल अर्नाल्ड (Russell Arnold) खूप प्रभावित झाला आहे. त्याने रोहितच्या नेतृत्त्वाची (Russell Arnold Praised Rohit Sharma’s Captaincy) भरपूर प्रशंसा केली आहे.
स्टार स्पोर्ट्सवरील कार्यक्रमात बोलताना अर्नाल्ड म्हणाला की, २०२१ टी२० विश्वचषकात भारतीय संघाकडून खूप अपेक्षा असल्यामुळे संघ दबावाखाली खेळला होता. त्यामुळे टी२० विश्वचषकानंतर भारतीय संघाला नव्या लिडरशीपची गरज होती. विराट कोहलीनंतर रोहित संघाला कशाप्रकारे पुढे नेत याबद्दलही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा- IND vs SL: दुसऱ्या टी२०त भारताचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय, असे आहेत ११ जणांचे दोन्ही संघ
४८ वर्षीय अर्नाल्ड स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, “बऱ्याचदा संघासाठी वेगळा आवाज चांगला असतो आणि भारतीय संघाला याची गरज होती. माझ्या विचारांनुसार, टी२० विश्वचषकात अपेक्षांचे ओझे अर्थातच दबाव भारतीय संघाच्या खेळातून स्पष्टपणे दिसत होता. परंतु आता तो दबाव संपला आहे आणि संघातील प्रत्येक खेळाडू स्वत:ला सिद्ध करण्यासाठी खेळतो आहे. कर्णधारही पुढे येऊन संघाचे नेतृत्त्व करतो आहे. रोहित १४० ते १५० च्या स्ट्राईक रेटने धावा करतो आहे आणि हे शानदार आहे.”
अर्नाल्ड पुढे म्हणाला की, “जर रोहित अशाप्रकारे संघाचे नेतृत्त्व करत राहिला, तर त्याला पुढे जास्त काही करण्याची गरज पडणार नाही. त्याच्या मते, भारतीय संघात जी खोली आहे, त्याला पाहता रोहितला जास्त काही करण्याची आवश्यकता नाही. याबद्दल तो म्हणाला की, जर कोण इतका चांगला आणि शांत दिसत असेल, तर त्याला जास्त काही म्हणण्याची गरज नसते. संघातील सगळे जण आपोआपच त्याचे म्हणणे ऐकतील. भारतीय संघात खूप जास्त खोली आहे आणि यामुळेच रोहितचे काम अधिकच सोपे झाले आहे.”
दरम्यान भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटकात २ बाद १९९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ ६ बाद १३७ धावाच करू शकला होता. परिणामी भारताने ६२ धावांच्या फरकाने हा सामना जिंकला होता. यानंतर हे दोन्ही संघ दुसऱ्या टी२० सामन्यासाठी धरमशाला येथे भिडले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
IND vs SL: दुसऱ्या टी२०त भारताचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय, असे आहेत ११ जणांचे दोन्ही संघ
तंबूत गेलेल्या खेळाडूला शाकिब अल हसनमुळे मिळालं जीवदान; पण क्रिकेटरनं असं केलं तरी काय? वाचा
हिटमॅनला सुवर्णसंधी! ‘ही’ गोष्ट करताच विराटला मागे टाकणारच, पण सामना जिंकला तर वर्ल्डरेकॉर्डही करणार