भारत आणि श्रीलंका टी20 मालिकेला आज (27 जुलै) सुरुवात झाली. पहिल्या टी20 सामन्यासाठी दोन्ही संघ आमने-सामने आहेत. या सामन्यात श्रीलंकेच्या संघानं टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतू भारतीय संघाच्या प्लेइंग 11 मध्ये मोठा बदल पाहायला मिळाला आहे. झिम्बाब्वे मालिकेत फ्लॉप ठरलेल्या रियान परागला (Riyan Parag) पहिल्या टी20 सामन्यात भारतीय संघात संधी मिळाली. तर चार मोठ्या खेळाडूंना दुर्लक्षित करण्यात आलं आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात शिवम दुबे, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर आणि खलील अहमद यांना प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळू शकले नाही. संजू सॅमसन आणि शिवम दुबे 2024च्या टी20 विश्वचषकात भारतीय संघाचा भाग होते आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या टी20 मालिकेतही त्यांनी प्रभावित केले होते. झिम्बाब्वेविरुद्धच्या टी20 मालिकेत मालिकावीर ठरलेल्या वॉशिंग्टन सुंदरलाही (Washington Sundar) प्लेइंग 11 मधून बाहेर ठेवण्यात आलं.
पहिल्या टी20 सामन्यासाठी दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
भारत- शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), रियान पराग, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज
श्रीलंका- पाथुम निसांका, कुसल मेंडिस(यष्टीरक्षक), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चरित असलंका(कर्णधार), वानिंदू हसरंगा, दासुन शनाका, महेश तीक्ष्णा, मथीशा पाथिराना, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका
महत्त्वाच्या बातम्या-
हँडबॉलपटूने हॉकी खेळाडूला सर्वांसमोर केले ‘फिल्मी स्टाईल प्रपोज’, पाहा व्हिडिओ
“सेक्स बेडरुमपर्यंत मर्यादित का राहू शकत नाही?” ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यावरून भडकली कंगना
जो रुटचा धमाका, कसोटीमध्ये ब्रायन लाराचा विक्रम मोडला; आता बारी सचिनची!